शिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक

Featured जळगाव
Share This:

शिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न.आरोपी अटक.

यावल तालुक्यात कायद्याचा धाक संपला.

यावल ( सुरेश पाटील): बारा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका तरुणाकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची घटना यावल तालुक्यात शिरसाड या गावी घडल्याने एकास अटक करण्यात आली.छेडखानी करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक राहिला नसल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.
शिरसाड येथील पीडित एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार शिरागड येथे हात मजुरी करून उदरनिर्वाह चालवतात शनिवार दि.20रोजी दुपारी फिर्यादीची12 वर्षाची लहान बहीण गावालगत कपाशीच्या शेतात सरपण जमा करण्यासाठी गेली असता यावेळी शिरसाड येथे राहणारा सखाराम उर्फ अक्रम मानसिंग बिलाला वय25ह.मु.वराडसिम तालुका भुसावल.हा तिथे आला त्यांनी या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला यावेळी मुलीचा आवाज ऐकून काही ग्रामस्थ व फिर्यादी तेथे पोहोचले हे पाहून सखारामने तेथून पळ काढला मात्र ग्रामस्थांनी पाठलाग करून त्यास पकडले व यावल पोलिसांना माहिती दिली.यानंतर पोस्को कायद्यान्वये बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा विनयभंग अधिक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करत आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *