
शिरपूर: तरुणांनी समाज कार्यासाठी पुढे यावे : आ. काशिराम पावरा
शिरपूर: तरुणांनी समाज कार्यासाठी पुढे यावे : आ. काशिराम पावरा
शिरपूर ( मनोज भावसार ) : तरुणांनी समाजकार्य व देश हितासाठी योगदान देण्यासाठी पुढे यावे असे आवाहान आ. काशिराम पावरा यांनी केले. तालुक्यातील भोरखेडा येथे शिरपूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व तपनभाई पटेल युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने (दि.18 जुन) रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी उदघाटनप्रसंगी आ. काशिराम पावरा उपस्थित तरुणाना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील हे होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणुन भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, नगर सेवक तपनभाई पटेल होते. भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी हि मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, जि. प. सदस्य प्रा. संजय पाटील, शिंदखेडा संजय गांधी योजना समिती चेअरमन डी. एस गिरासे यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबीर यशस्वीसाठी भोरखेड्याचे डॉ. सुदाम कुमावत, संग्राम राजपूत, भुपेंद्र राजपूत, जगदिश राजपूत, भटेसिंग राजपूत, विनोद लोहार, श्रीकांत राजपूत, विश्वास मोरे, संदिप वानखेडे, दिपक भिल, सुनिल राजपूत, जिल्हा संयोजक देवेंद्र देशमुख, युवा मोर्चा तालूका संयोजक ब्लड डोनेशन विरपाल राजपूत, युवा मोर्चा तालुका संयोजक सुरेंद्र (सोनू) राजपूत यांनी परिश्रम घेतले. तसेच भोरखेड्या येथील एकूण 60 तरुण मंडळींनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले कोरोना ग्रस्त रुग्णाना मदत कार्यासाठी हि संकल्पना राबवण्यात आली होती.