
शिरपूर: आर सी पटेल अभियांत्रिकीत ‘ मशीन लर्निंग’ विषयावर कार्यशाळा संपन्न
शिरपूर: आर सी पटेल अभियांत्रिकीत ‘ मशीन लर्निंग ‘ विषयावर कार्यशाळा संपन्न
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि): येथील आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागातर्फे घेण्यात आलेल्या मशीन लर्निंग विषयावरील कार्यशाळेत राज्यातील ३१ विविध अभियांत्रिकी व संगणकशास्त्र महाविद्यालयातील ४०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी उस्त्फुर्त सहभाग घेतल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे.बी.पाटील व विभाग प्रमुख डॉ. नितीन पाटील यांनी दिली.
येथील आर सी पटेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागाने मशीन लर्निंग या सध्या चर्चेत असणाऱ्या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत मशीन लर्निंगचे विविध अल्गोरिदम शिकविण्यात आले तसेच त्याचे गुगल कोलॅब आणि ज्युपिटर नोटबुकद्वारे वेगवेगळ्या डाटाबेसवर प्रात्यक्षिकही करून दाखविले गेले. सहभागी विद्यार्थ्याचे एकूण ६ ऑनलाईन सत्र व ३ परीक्षा या कार्यशाळे दरम्यान घेण्यात आल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना ई- प्रमाणपत्र देण्यात आले. अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्वाचा भाग असलेल्या प्रकल्प(प्रोजेक्ट) व पदवी प्राप्त केल्यानंतर विविध कंपनीद्वारे होणाऱ्या प्लेसमेंट साठी ही कार्यशाळा व त्यातील मार्गदर्शन खूपच उपयुक्त असल्याचा अभिप्राय सहभागी विद्यार्थ्यांनी नोंदविला.
सहभागी विद्यार्थ्यांना प्रा.सचिन परदेशी, प्रा.पंकज कासार व प्रा.शकील पिंजारी यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या विविध शंकांचेही निरसनही केले.
विद्यार्थी स्वयंसेवक सौरभ निकुंभ, रवीना धमानी, प्रतीक जोशी, गौरव शर्मा व पंकज कट्यारे यांच्यासह विभागातील प्राध्यापकांनी कार्यशाळेच्या आयोजनासाठी व यशस्वीतते साठी परिश्रम घेतले.
या उपक्रमाच्या साठी प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील उपप्राचार्य डॉ.पी.जे.देवरे, संगणक विभाग प्रमुख डॉ.नितीन पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन प्रसिद्धी प्रमुख प्रा.सुहास शुक्ल तसेच सर्व विभागप्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाच्या ह्या उपक्रमाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक तपनभाई पटेल, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, यांनी समाधान व्यक्त केले.