Tezsamachar

शिरपूर सावधान : मुंबईहून इगतपूरी- सटाणामार्गे साक्रीत पोहचणार चक्रीवादळ

Featured धुळे
Share This:

शिरपूर सावधान : मुंबईहून इगतपूरी- सटाणामार्गे साक्रीत पोहचणार चक्रीवादळ

साक्री, शिंदखेडा, शिरपूरला उद्या निसर्ग सायक्लॉन वादळ धडकणार


जळगाव ( रामदास माळी) :
 कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग सायक्लॉन चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर ३ जून रोजी चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मुंबई किनारपट्टीवरून इगतपूरी-सटाणा मार्गे साक्री, शिंदखेडा, शिरपूरला निसर्ग सायक्लॉन उद्या ४ रोजी धडकणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. या परिसरातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
३ जून रोजी दुपारी मुंबई किनारपट्टीवरून रात्री आठ वाजेच्या दरम्यान ठाणे पाचड, भिवंडी वाडामार्गे इगतपूरी तर ४ जून रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान इगतपुरी त्र्यंबकेश्‍वर, कपराडा मार्गे वणी दुपारी दोननंतर वणी, सापुतारा, कळवण सटाणा, नामपूर, साक्रीला धडकणार आहे. त्यानंतर पहाटे चार वाजेच्या सुमारास साक्री- म्हसदी-लामकानी मार्गे चिमठाणे मार्गे वर्शीला पोहचणार आहे.  सकाळी ८ वाजेच्या सुमारास वर्शी, थाळनेर-लामकानी-चिमठाणे मार्गे शिंदखेडा आणि त्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास शिंदखेडा, जैतपूर येथून शिरपूरमार्गे सुळे तर सकाळी दहाच्या दरम्यान मध्यप्रदेशातील खरगोणला निसर्ग सायक्लॉन धडकणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. निसर्ग चक्रीवादळ ३ जूनपासून ६ जूनपर्यत भारतीय भूमीवर असेल, असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर ते नेपाळमध्ये प्रवेश करेल. यापैकी ३ जून ते ४ जूनपर्यंत चक्रीवादळ महाराष्ट्रात घोंघावणार आहे. यादरम्यान अनेक ठिकाणी २ जूनपासून वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तेज़ समाचार ब्यूरो

राज्यातील सात जिल्ह्यांना सर्वाधिक धोका
अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने शंभर वर्षांत पहिल्यांदाच मुंबईच्या किनार्‍यावर चक्रीवादळ धडकणार आहे. त्यांचा ताशी वेग ९० ते १२५ किमी राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मुंबईसह राज्यातील सात जिल्हयांना या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हरिहरेश्वरसह अलिबागला बसण्याची शक्यता आहे.
एनडीआरएफच्या १५ टीम तैनात
बांगलादेशने या चक्रीवादळाला ’निसर्ग’ असे नाव दिले आहे. राज्यात निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्‍वभुमीवर एनडीआरएफच्या १५ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईत एनडीआरएफच्या तीन टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, नाशिकमध्येही अचानक पूर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

एचएडीआर आहेत सुसज्ज.

निसर्ग चक्रीवादळ अरबी समुद्रात घोंघावत असल्याने सर्व पथके सतर्क झाली आहेत आणि वादळाच्या काळात लोकांना मदत व आपत्ती निवारणा (एचएडीआर) च्या कोणत्याही आवश्यकतेला प्रतिसाद देण्याची तयारी दर्शविली आहे. नैसर्गिक आपत्ती व इतर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या बचाव आणि मदत कार्यात सहाय्य पुरविण्याच्या प्रत्येक प्रयत्नात भारतीय नौदल नेहमीच आघाडीवर असते. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्याने अतिरीक्त पाऊस पडल्यास आणि शहरी आणि ग्रामीण भागातील पूर परिस्थिती निर्माण झाल्यास पश्चिमी नौदल कमांडने पश्चिम किनारपट्टीवरील संबंधित राज्य सरकारांच्या समन्वयाने पूर, बचाव आणि डायव्हिंग मदतीसाठी पुरेशी संसाधने जमा केली आहेत. अतिवृष्टीमुळे किनारपट्टीचे क्षेत्र पुराच्या पाण्यात बुडल्यास वेस्टर्न फ्लीटमधील जहाजे लोकांची मदत आणि आपत्ती निवारण (एचएडीआर)साठी सुसज्ज आहेत.

तेज़ समाचार ब्यूरो

पंतप्रधान मोदी यांचा नागरीकांना संदेश
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी या निसर्ग सायक्लॉन वादळाच्या पार्श्‍वभुमीवर आढावा घेतला आहे. त्यांनी नागरिकांना शक्य ती सर्व सावधगिरी बाळगण्याचे तसेच सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन केले. भारताच्या पश्चिम किनारपट्टी भागातील चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी नागरीकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही ४८ तास रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *