
शिरपूर: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
शिरपूर: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि): शिरपूर येथील सामाजिक वनीकरण विभाग, स्व.शंकर पांडू माळी माध्यमिक विद्यालय व खान्देश पर्यावरण संरक्षण मंडळामार्फत आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्व.शंकर पांडू माळी माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात वनक्षेत्रपाल श्री. कालिदास सैंदाणे,सामाजिक वनीकरण शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले.झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात आपण निसर्गाची परतफेड करावी व भावी पिढीला ऑक्सिजन मुबलक मिळावा म्हणून वृक्षारोपण हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवून प्रत्येकाने एक तरी झाड लावावे असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल श्री एन.एन.वाघ,वनपाल श्री.एम डी.मरसाळे,वनरक्षक श्री.एन डी.थोरात,श्रीमती पी.ए.अंबोरे,स्व.शंकर पांडू माळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.के.पी. पाटील उपशिक्षक श्री.एम.जे. माहेश्वरी, श्री.एस.एम. पाटील,श्री.जे.डी.कुवर,श्री. के.बी.पावरा, श्री.राकेश पाडवी, श्री.संदीप सोनवणे,श्री.सतीश चौधरी,श्रीमती शीतल बोदडे, श्री जितेंद्र सपकाळ आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खान्देश पर्यावरण संरक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री हेमंत शेटे,कार्याध्यक्ष श्री जितेंद्र शेटे,उपाध्यक्ष श्री सतीश मिस्तरी,सदस्य हेमंत शिरसाठ,भरत भोई,भूषण वाडीले,मोहित महाले,सुदर्शन गोसावी,सुनील दाभाडे,योगेश पाटील आदींनी परिश्रम घेतले