
शिरपूर Corona virus Update : शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीची वेळ व ठिकाण
शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीची वेळ व ठिकाण – अंमल बजावणी दि.२९ पासून
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि ): कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात दिनांक २५ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन लागू केलेला आहे.बंदच्या काळात किराणा,भाजीपाला/फळ,दुग्धालय,औषधालाय आदी जीवनावश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये संपर्क साखळी खंडित करणेकामी शिरपूर वरवाडे नगरपरिषने व्यापारी व नागरिकांसाठी ठरवून दिलेल्या दिवशी, निश्चित केलेल्या ठिकाणी व वेळेत उपलब्ध करून देण्याचे आवाहन व्यापारी व नागरिकांना शिरपूर वरवाडे नगरपरिषदेने केले आहे.पुढील आदेशपर्यत जीवनावश्यक वस्तू नमूद केलेल्या ठिकाणी व वेळेत विक्री व खरेदी केली जाणार आहे.
शहरातील किराणा दुकान सकाळी १० वा. ते १२ वा पर्यंत उघडले राहणार आहे. तर भाजीपाला/ फळ तसेच शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दि. २९ मार्च २०२० पासून नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ६० ठिकाणी ओपन स्पेसमध्ये एका ठिकाणी ४ भाजीपाला विक्रेते व एक फळविक्रेता याप्रमाणे सकाळी १० वा. पासून दुपारी १२ पर्यंत दोन तास व्यापारी व नागरिकांना खरेदी विक्री करण्यात येणार आहे तर दुध विक्रेते दररोज सकाळी ६ वा. ते ९ वा. व सायंकाळी ५ वा. ते ७ वा. या दरम्यान शहरात दूध पुरवठा करणार आहेत तसेच मेडिकल दुकान (दवाखान्याशी संलग्न असलेले सोडून) दररोज सकाळी १० वा ते १२ वा. पर्यंत आणि दुपारी ४ ते ६ वा. पर्यंत उघडे राहणार आहेत यासाठी नगरपालिकेने नियोजन केले आहे याची नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन शिरपूर वरवाडे नगरपालिका प्रशासनाने केले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शासन यांनी दि. २३ मार्च २०२० पासून संचारबंदी आदेश लागू केल्याने आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २४ मार्चच्या मध्य रात्रीपासून लाॅकडाऊन जाहीर केल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त रस्त्यावर फिरू नये अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.असे आवाहन शिरपूर वरवाडे नगरपालिका प्रशासनाने केले आहे.