
शिरपुर : एसीबीच्या गळाला लागला छोटा मासा! 2 हजारांची लाच घेताना कंत्राटी अभियंत्याला अटक
शिरपुर (तेज समाचार प्रतिनिधि): धुळे पंचायत समितीचा कंत्राटी अभियंत्याला दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या पथकाने पकडले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार की,तक्रारदार यांचे पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर असून त्यांचे बांधलेल्या घरकुलाचे फोटो काढून,नजर तपासणी करून मूल्यांकन सादर करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे त्यांनी 2000 रुपये ची मागणी24/02/2020रोजी केली होती.व आज ती रक्कम लाचेची मागणी करून 2000/-₹ लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर रंगेहात लाचलूचपत विभाग पथकाने सापळा रचून आरोपी भूषण शामराव वाघ वय- 25वर्ष, व्यवसाय- ग्रामीण गृह निर्माण अभियंता ( कंत्राटी) (वर्ग 3)पंचायत समिती धुळे, रा.श्रमसाफल्य कॉलनी होमगार्ड ऑफिस चे पाठीमागे वलवाडी देवपूर याला एसीबीने पकडले आले आहे.
पुढील तपास लाचलुचपत विभागाचे अधिकारी करीत आहेत