शिरपूर (तेज समाचार डेस्क): येथील श्री ब्राह्मण सभा व श्री ब्रह्मशक्ती युवामंच यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शनिवार दि.१५ फेब्रु.२०२० रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनातून श्री संत गजानन महाराज यांचा १४२ व्या प्रगट दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सभेतर्फे ईच्छापूर्ती गणपती मंदिरावर केलेल्या पुष्पसजावटीने व नयनरम्य विद्युत रोषणाई ने सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. गण गण गणात बोते या मंत्राच्या गजराने व भाविकांच्या प्रचंड गर्दीने मंदिर व परिसरातील वातावरण चैत्यन्यमय झाले होते.
प्रगट दिनाच्या कार्यक्रमांना सकाळी ८ वाजता गणपती व श्री गजानन महाराजांच्या मूर्तीस अभिषेक करून सुरुवात झाली. या निमित्ताने राधे राधे ग्रुपच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन सभेचे अध्यक्ष ऍड सुहास वैद्य व ब्रह्मशक्ती युवामंच चे अध्यक्ष प्रसाद धमाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ब्राह्मण सभेचे कार्याध्यक्ष अजय धर्माधिकारी, उपाध्यक्ष अविनाश शुक्ल , संचालक किशोर कुलकर्णी, प्रशांत पाठक, महिला संचालक उत्तरा जोशी, मंजुषा जोशी, धनश्री कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी ,राधे राधे सोशल ग्रुपचे सदस्य, युवामंच चे प्रमुख सल्लागार व ब्राह्मण महिला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते . या शिबिरात एकूण ३५ दात्यांनी रक्तदान केले.या सर्वांना येथील एचडीएफसी बँकेतर्फे फळ वाटप केले गेले. रक्तदान शिबिरासाठी साह्य करणाऱ्या धुळे येथील नवजिवन रक्तपेढीचे चौधरी व सहकाऱ्यांचा सन्मान प्रा.सुहास शुक्ल यांच्या हस्ते करण्यात आला.
या नंतर दुपारी महाप्रसादाचे मानकरी किशोर व सौ धनश्री कुलकर्णी यांच्या हस्ते महारांजच्या पालखीचे पूजन करून पालखी सोहळ्यास सुरुवात झाली.यात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला. महंत सतिशदास भोंगे यांच्या भजनी मंडळाने पालखी सोहळ्यात भजनसेवा समर्पित केली. परिसरातील महिलांनी पालखी मार्गावर रांगोळ्या घालून व पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत करीत दर्शनाचा लाभ घेतला. महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती व त्यांनी भजनी मंडळाच्या तालावर धरलेल्या नृत्य व फुगडी च्या ठेक्याने पालखी सोहळ्याची रंगत अधीकच वाढली.सुमारे 3 तास चाललेल्या या सोहळ्याची सांगतां 5 वाजता झाली. या नंतर सायंकाळी श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पाद्यपूजन किशोर कुलकर्णी व प्रशांत महाजन यांच्या हस्ते करण्यात आले व महाआरती झाली. सुमारे १००० च्या वर भाविकांनी महाआरती ला उपस्थिती लावली . सभेतर्फे भाविकांसाठी १३० किलो पिठाच्या बाजरी भाकरी, ७० किलो पिठाचे पिठले, मिरचीचा खुडा अश्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दर्शन व महाप्रसादास रात्री उशिरा पर्यंत भाविकांची रीघ लागलेली होती. ब्राह्मण सभा व ब्रह्मशक्ती युवा मंचा तर्फे या कार्यक्रमाचे सुरेख व शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी मानस शुक्ल, मंचाचे कार्यअध्यक्ष तुषार मिठभाकरे, उपाध्यक्ष भूषण जोशी,रोहित कुलकर्णी, कोषाध्यक्ष जयेश भोंगे, कौस्तुभ शुक्ल, सचिव हर्षल जोशी, जयेश जोशी यांच्या सह गौरव जोशी, पद्माकर जोशी, गौरव कुलकर्णी, अंकित कुलकर्णी, निलेश उर्ध्वरेषे, अजिंक्य शुक्ल, विजय दंडवते, योगेश कुलकर्णी, गीतेश भागवत, विनय वैद्य, रितेश जोशी, अभिराज वैद्य, मिहीर शुक्ल व ब्राह्मण सभेच्या पदाधिकाऱ्यानी प्रयत्न केले.