शिरपूर: आर.सी. पटेल पटेल अभियांत्रिकीच्या 40 विदयार्थ्यांची कॉग्नीझंट कंपनीत निवड. आज पर्यंत विद्यार्थ्यांना एकुण ३८३ ऑफर

Featured धुळे
Share This:

शिरपूर: आर.सी. पटेल पटेल अभियांत्रिकीच्या 40 विदयार्थ्यांची कॉग्नीझंट कंपनीत निवड. आज पर्यंत विद्यार्थ्यांना एकुण ३८३ ऑफर

शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि : येथिल आर.सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची कॉग्नीझंट या बहुराष्ट्रीय कंपनीत ट्रेनी प्रोग्रॅमर अनॅलिस्ट या पदावर वार्षिक रु. लाख या वेतनश्रेणीवर निवड झाली असून या वर्षी आज पर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय बहुराष्ट्रीय अशा विविध कंपनीतील नोकरीच्या एकुण ३८३ ऑफर मिळाल्या असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळातही महाविद्यालयाने ओंनलाईन दृक श्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कंपनींच्या मुलाखतीसाठी सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचेही प्राचार्य डॉ.पाटील यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान, माहिती सुरक्षा, सल्लागार, आयटीओ आणि बीपीओ अशा विविध क्षेत्रात कॉग्निझंट कंपनी सेवा प्रदान करते.यातंर्गत व्यवसाय आणि तंत्रज्ञान सल्लामसलत, प्रणाली एकत्रीकरण, अनुप्रयोग विकास आणि देखभाल समाविष्ट आहे. आय.टी. इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस, अॅनालिटिक्स, बिझिनेस इंटेलिजेंस, डेटा वेअरहाऊसिंग, ग्राहक संबंध व्यवस्थापन, पुरवठा शृंखला व्यवस्थापन, अभियांत्रिकी उत्पादन उपाय, एंटरप्राइझ रिसोर्सेस प्लॅनिंग, संशोधन आणि विकास आउटसोर्सिंग आणि चाचणी उपाययोजनेची विविध कामे कंपनी तर्फे जगभरात सुरु आहेत. आर.सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय कॉग्नीझंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.

तीन स्तरावर झालेल्या या निवड प्रक्रियेत सुरवातीला बुद्धिमत्ता चाचणी, तांत्रिक मुलाखत शेवटी एच. आर. राउंड झाला. त्यात ४० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. शाखेनिहाय निवड झाली. यात संगणक अभियांत्रिकी शाखेतील पाटिल विशाल, अतुल पाटील, जयराज पवार, गौरव शर्मा, ऋषिकेश जैन, मानस शुक्ल, स्मिता देवरे, रोशनी चौधरी, वरुण शाह, हर्षदा जाधव, तेजश्री चौधरी, पाटील प्रफुल्ल, येवले अपूर्वा, दोरीक अश्विनी, शामल सोनजे, स्वप्निल पाटील, तेजल जिरेकर, पाटील प्राजक्ता. माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी शाखेतून हर्षदा देसले, पीयूष सोनवणे, राजाश्री परदेशी, मुस्कान तनेजा, नेहा पाटील, मीनल पाटील, आसिमा खान, अभिलाषा विश्वकर्मा, इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेषन अभियांत्रिकी शाखेच्या दिव्या मराठे, राजेश्वरी वाघ, दिव्या परदेशी, ऋषिकेश चौधरी, दिपमाला पाटील, भरत खैरनार, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीतील अंकित जाधव, अश्विनी चौधरी, मयूर काळे आणि मेकॅनिकल अभियांत्रिकीतून सिद्धेश बोरकर, जुनेद शेख, सुमित वाडीले, विकास धनगर, निलेश सोनवणे या एकुण ४० विद्यार्थ्यांची ट्रेनी प्रोग्रॅमर अनॅलिस्ट या पदावर वार्षिक रु. लाख या वेतनश्रेणीवर निवड झाली. निवड प्रक्रियेच्या यशस्वितेसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन, प्रा.एस. एन.परदेशी, प्रा. व्ही. एस. रघुवंशी, प्रा. पी.एस. पाटील, प्रा. एल. एस. महाजन, प्रा. व्ही.व्ही. पटेल यांनी परिश्रम घेतलेत.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक तपनभाई पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. पी. जे. देवरे, , विभाग प्रमुख प्रा.सुहास शुक्ल, प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा.पी.एल सरोदे, प्रा. व्ही. एस. पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ.प्रशांत महाजन, महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले.

Chaddha Classes

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *