शिरपूर : आर.सी. पटेल अभियांत्रिकीच्या विदयार्थ्याद्वारे विकसित  डिझाईनची  पेटंट म्हणून नोंदणीस स्वीकृती

धुळे
Share This:

शिरपूर : आर.सी. पटेल अभियांत्रिकीच्या विदयार्थ्याद्वारे विकसित  डिझाईनची  पेटंट म्हणून नोंदणीस स्वीकृती

शिरपूर  (तेज समाचार प्रतिनिधि ) : भारत सरकारच्या कोलकत्ता येथील पेटंट कार्यालयाने येथील आर.सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित तयार केलेल्या डिजिटल कॅलीब्रेशन इंस्ट्रयुमेंट या उपकरणाच्या संरचनेला व प्रतिकृतीला डिझाईन  पेटंट साठी नोंदणीची परवानगी दिली असून सदर डिझाईन विभागातर्फे अधिकृत मासिकात प्रकाशित करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील व  या उपक्रमाचे मार्गदर्शक प्रा हेमराज कुमावत यांनी दिली आहे.

आर.सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्रा.हेमराज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय जाधव, आकांक्षा पाटील आणि निशिगंधा कुमावत तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या चमूने मागील वर्षी पुरातन वास्तू तसेच बांधकामाची क्षमता तपासण्यासाठी कॉन्क्रीट टेस्टींग हॅमर नामक उपकरणाची निर्मिती करून त्याचे पेटंट मिळविले होते. या संदर्भातील संशोधन पुढे नेत असताना विविध परीक्षणांती त्याच्या लक्षात आले कि सदर कॉन्क्रीट टेस्टींग हॅमर वारंवार वापले असता पुनरावृत्ती मुळे हॅमरच्या आतील स्प्रिंगची कठोरता कमी होते. स्प्रिंग सैल झाल्याने तिच्या कंपना मध्ये  बदल होऊन चाचणीच्या गणनेत तफावत येते. यामुळे दीर्घ वापरा नंतर प्रत्येक उपकरणात किंवा त्याचे  काही भाग बदलणे आवश्यक असते व सादर बदल केल्यानंतर ते उपकरण प्रमाण मानक नियमानुसार (ISO) मापांकन (Calibration) करणे आवश्यक असते. या नुसार हे मापांकन प्रमाणित स्टील एनव्हील रिबाउंड हॅमरच्या सहाय्याने केले जात होते. यात अधिक अचूकता यावी या साठी विद्यार्थ्यांनी संशोधन करून  विविध चाचणी व तपासणी केल्या नंतर  डिजिटल कॅलीब्रेशन इंस्ट्रयुमेंट या उपकरणाची  संरचना करून त्याचे डिझाईन तयार केले. त्या नुसार या उपकरणाची  प्रतिकृतीहि तयार केली. सदर संशोधन हे  पेटंट करण्यासाठी भारत सरकारच्या कोलकत्ता येथील पेटंट कार्यालयात  दाखल केले गेले. या उपकरणास डिझाईन पेटंट या श्रेणीत नोदणी करण्यास  स्वीकारले असल्याचे विभागाने कळविले असून सादर डिझाईन सर्व सामान्यांच्या परीक्षणा साठी विभागाच्या अधिकृत जर्नल मध्येही प्रकाशित करण्यात आलेले आहे. या साठी विद्यार्थ्यांना प्रा. कुमावत , विभाग प्रमुख प्रा. गणेश तपकिरे , प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक तपनभाई पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. पी. जे. देवरे, , विभाग प्रमुख प्रा.सुहास शुक्ल, प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा.पी.एल सरोदे, प्रा. व्ही. एस. पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ.प्रशांत महाजन, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले.

Chaddha Classes

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *