
शिरपूर : पोलीसांनी दारूची चोरटी विक्री विरूध्दात केली कारवाई – 43 हजाराचा विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त
शिरपूर : पोलीसांनी दारूची चोरटी विक्री विरूध्दात केली कारवाई – 43 हजाराचा विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त
शिरपूर (जुनेद शेख ): शिरपूर शहर पोलीसांनी आज दुपारी दारूची चोरटी विक्री विरूध्दात कारवाई केली असुन ४३ हजाराचा विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुपीत माहिती नुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई किरण बार्हे,पोलीस कॉंस्टेबल संदिप रोकडे,पो कॉ महेंद्र सपकाळ,मुजाहिद शेख,गणेश सोनवणे
आदींनी आज दुपारी शिरपूर तालुक्यातील कळमसरे गावाच्या पुढे प्रिन्स हॉटेलच्या मागे असलेल्या एका झोपडीच्या आडोशाला धुळे येथील भगवानसिंग भिमसिंग सिसोदिया रा.नगावबारी,देवपुर हा ईसम झोपडी जवळ गर्दी करून उभा दिसला यावेळी पोलीसांनी छापा टाकला असता त्याच्या ताब्यातील २५ हजार ७४० किंमतीची टुरबोग बियर,१४७०० किंमतीची किंगफिशर आणी ३५०४ किंमतीचे कँनोन स्ट्रोंग अशी एकुण ४३९४४ किंमतीचा विदेशी दारू मुद्देमाल जप्त करण्यात आली असुन संशयित भगवानसिंग सिसोदिया पोलीस स्टेशन येथे आणले असुन उशिरापर्यंत पुढील कारवाई सुरु होती.