
शिरपूर : पोलिसांची सट्टा मटका खेळणाऱ्यांवर धडक कार्यवाही,लाखोंचा मुद्देमाल जप्त करीत सहा अटक
शिरपूर (तेज़ समाचार प्रतिनिधी) : शहरातील मांडळ शिवारात गाडीत सट्टा मटका खेळतांना शिरपूर शहर पोलिसांनी कार्यवाही करीत १ लाख ६२ हजार ६४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करीत सहा जणांना अटक करण्यात आली.
शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांडळ शहरात साहेब हॉटेलच्या बाजूला असलेल्या टपरी जवळ एका चारचाकी वाहनात सार्वजनिक जागी टाटा कंपनीची एमएच -३१ बीबी २३२१ या गाडीत सट्टा मटका खेळत असल्याची गोपीनय माहिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती
मिळालेल्या माहितीवरून पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने व पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, स्वप्नील बांगर,उमेश पाटील, नरेंद्र शिंदे,अमित रनमाळे यांनी दि.६मार्च २०२० रोजी दुपारी दीड वाजता धाड टाकून धडक कार्यवाही केली. या कार्यावयीत ६८५०० रुपये किमतीचे विविध कंपनीचे- मोबाईल सह ११४० रुपये रोख असा एकूण १ लाख ६२ हजार ६४० रुपये मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पोकॉ स्वप्निल बांगर यांनी आरोपी हरीश मदनलाल जैन वय ३० आनंद प्रकाश चंद्र शर्मा वय २४ मदनलाल जैन व ४४ तिघे-आदर्शनगर) विनोद किसन चौधरी वय २८ (रा. माळी गल्ली, संजय देविदास पांडव वय ३४( खालचे गाव बौद्ध वाडा) आकाश राजेंद्र चौधरी रान वय २४ (अंबिकानगर) सर्व शिरपूर यांच्या विरोधात फिर्याद दिली असून मु.जु का.क. १२(अ)प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.