माजी मंत्री पटेल आणि आमदार पावरा यांच्या प्रयत्नातून शिरपूरमधील रस्ते 15 कोटींच्या निधी अर्थसंकल्पात मंजूर

Featured धुळे
Share This:

शिरपूर (तेज़ समाचार प्रतिनिधि ): माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या मार्च २०२० च्या अर्थसंकल्पात शिरपूर शहरासह तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील विविध रस्त्यांसाठी, संरक्षक भिंत व लहान पुलांसाठी एकूण १५ कोटी ७० लक्ष रुपयांचा भरघोस आर्थिक निधी मंजूर झाला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विकासकामांची घोडदौड सातत्याने सुरु आहे.

या भागात होईल रूपांतर

माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल व शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी सातत्याने पाठपुरावा करून आतापर्यंत भरघोस निधी मंजूर करून आणला आहे. बोराडी ते न्यू बोराडी उमर्दे वकवाड पळासनेर रस्ता प्रजिमा ५ किमी २/०० ते ८/४०० मध्ये रुंदीकरणासह बांधकाम करणे, तालुका शिरपूर जिल्हा धुळे १ कोटी ७५ लक्ष रुपये, शिरपूर निमझरी बोराडी रस्ता इजिमा ३९ किमी ४/०० ते११/०० चे बांधकाम करणे १ कोटी ५५ लक्ष रुपये, प्रजिमा ९ ते अनेर डॅम रस्ता  ग्रामा ९४ किमी०/०० ते ३/०० चे बांधकाम करणे व किमी २/५०० मध्ये उजव्या बाजूस संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे १ कोटी २० लक्ष रुपये, नांदर्डे ते वासर्डी रस्ता ग्रा मा ३२ किमी ०/०० ते ३/०० चे बांधकाम करणे ९० लक्ष रुपये, रा. मा. – ४ ते भाटपुरा ग्रा मा ८७ किमी ०/०० ते ३/०० चे संरक्षण भिंतीसह रस्ता बांधकाम करणे ९० लक्ष रुपये, हिसाळे महादेव रस्ता प्रजिमा ९ किमी ३/८००, ६/९००, ७/३००, ९/६०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे व किमी ०/०० ते १४/४०० मध्ये जलनिस्सारण, संरक्षक कामे करणे ९० लक्ष रुपये, रा. मा. ४ ते तांडे ग्रा मा १३ किमी ०/०० ते २/०० चे सा क्र ०/१०० मध्ये लहान पुलांचे बांधकाम करणे १ कोटी २० लक्ष रुपये, लालमाती खंबाळे रस्ता ग्रा मा – ११६ किमी ०/०० ते ५/०० चे बांधकाम करणे २ कोटी रुपये, सुळे रोहिणी भोईटी रस्ता प्रजिमा- ८ किमी ६/६०० ते १०/८०० चे बांधकाम करणे १ कोटी ५० लक्ष रुपये, सलाईपाडा ते नवाधाबापाडा बोराडी रस्ता किमी ०/०० ते ७/०० चे बांधकाम करणे १ कोटी २० लक्ष रुपये, कोडीद ते उमरपाडा रस्ता ग्रामा १७२ किमी १/०० ते ५/०० ची सुधारणा करणे १ कोटी रुपये, रा. मा. १ ते आपसिंगपाडा रूपसिंगपाडा ते फत्तेपूर रस्ता ग्रा मा १०८ चे रस्ता बांधकाम करणे ४० लक्ष रुपये, चोंदी झेंडेअंजन पनाखेड रस्ता प्रजिमा६ किमी १०/०० ते १२/०० मध्ये रुंदीकरणसह जलनिस्सारण काम करणे १ कोटी २० लक्ष रुपये असे एकूण १५ कोटी ७० लक्ष रुपयांचा भरघोस आर्थिक निधी माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने मंजूर झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त्‍ करण्यात येत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *