शिरपूर: विवाहचा खर्चातुन वाचलेला पैसा वधु-वरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी राखून ठेवावा : अरुण धोबी

Featured धुळे
Share This:

विवाहचा खर्चातुन वाचलेला पैसा वधु-वरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी राखून ठेवावा : अरुण धोबी

शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि मनोज भावसार): साध्या पद्धतीने विवाह होणे ही धोबी समाजातील क्रांती आहे. रूढी-परंपरांना समाज तिलांजली देत आहे हे प्रगतीचे लक्षण आहे. समाजात अशा पद्धतीने विवाह कार्यक्रम घडवून आणणे अत्यंत गरजेचे आहे. अशा पद्धतीने आपण श्रीसंत गाडगे बाबांच्या समाज सुधारणेचा वारसा पुढे चालवत आहोत. समाज जर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत असेल तर त्याची प्रगती निश्चित होणार आहे. या विवाह कार्यक्रमातून वाचलेला जो पैसा आहे तो पैसा वधू-वरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी राखून ठेवला पाहिजे असे मत परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी यांनी व्यक्त केले. शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील रहिवाशी निंबा राजाराम बोरसे यांची नात तर भगवान निंबा बोरसे यांची ज्येष्ठ कन्या चि. सौ. का. सारीका तसेच शिरपूर येथील श्रावण शंकर येशी यांचे व्दितीय चिरंजीव नरेंद्र यांचा विवाह दि.३० जुन रोजी सकाळी १२:३० वाजेला वाघाडी येथे साध्या पध्दतीने घरगुती वातावरणात ठरावीक आप्तेष्ट यांचा उपस्थितीत सामाजिक अंतर व नियमांचे काटेकोर पालन करीत विवाह सोहळा झाला. त्याप्रसंगी वधु-वरांना आशिर्वाद देतांना परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी बोलत होते. विवाह सोहळा समारंभ प्रसंगी परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शिरपूर कृउबा समिती संचालक अॅड. प्रताप पाटील, नगरसेवक चंद्रकांत सोनवणे, पोलिस पाटील अमोल पवार, म. गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्रीराम माळी, शिरपूर परिट (धोबी) सेवा मंडळ तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, कोळी समाज तालुकाध्यक्ष विनायक कोळी, पत्रकार संतोष भोई, शिरपूर रिक्षा युनियन शहराध्यक्ष प्यारे (मोहन) येशी, दोन्ही वधु-वर पक्षातील नातेवाईक मुलीचे आई, वडील, भाऊ, काका, काकु, मामा, मामी, आत्या, मामा, मुलाचे आई, वडील, भाऊ, काका, काकु, मामा, मामी, आत्या, मामा आदी उपस्थित होते. हा विवाह २७ एप्रिल रोजी ठरला होता. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर हे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. दरम्यान पुन्हा हे लग्न पुढे न ढकलता दोन्हीकडील नातेवाईकांनी मध्यस्थी करत साध्या पध्दतीने दि.३० जुन रोजी घरगुती वातावरणात सामाजिक अंतर व सुरक्षिततेचे नियम पाळून हा आदर्श विवाह सोहळा झाला. या नव वधु वर दापत्यांना अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीयध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया, उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, महाराष्ट्र परिट (धोबी) समाज आरक्षण समन्वय समिती ज्येष्ठ मार्गदर्शक रमाकांत कदम, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश सुकाणु समिती चेअरमन किसनराव जोर्वेकर आदिंनी शुभेच्छा व आशिर्वाद दिले आहेत.

Chaddha Classes

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *