शिरपूर मास्क लावणे बंधनकारक !

Featured धुळे
Share This:

शिरपूर मास्क लावणे बंधनकारक !

शिरपूर (तेज समाचार डेस्क) : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आवश्यक असल्याचं अनेक अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जातना मास्क वापरण्यात येणं गरजेचं.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शिरपूर तालुक्यातील तहसीलदार व दंडाधिकारी यांनी आदेश जारी केले आहेत.तालुक्यातील सर्व नागरिकांना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे.हे मास्क मानांकित प्रतिचे किंवा घरगुती पध्दतीने तयार केलेले व योग्य पध्दतीने स्वच्छ व निर्जंतुक करून पुन्हा वापरता येण्याजोगे अथवा तोंडाला रूमाल बांधणे आवश्यक आहे.या आदेशाचे उल्लंघन केल्यास साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७,आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, व भारतीय दंड सहिता १८६० चे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी व संबधित व्यक्तीस ५०० रू दंड वसुल करून मुख्यमंत्री साहायता निधी कोवीड १९ साठी जमा करणे बंधनकारक राहणार आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *