शिरपूर: चायना वस्तूंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बहिष्कार आणि चीनच्या प्रतिमात्मक दहन
शिरपूर: चायना वस्तूंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बहिष्कार आणि चीनच्या प्रतिमात्मक दहन
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि मनोज भावसार) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सर्व शिरपुरकर जनतेला विनम्र आवाहन करण्यात येत आहे की यापुढे आपण कुठल्याही चायनीज वस्तूची खरेदी करू नये. पूर्णपणे या वस्तूंचा बहिष्कार करावा. आपल्या देशात कोट्यावधी रुपयांची कमाई करत आर्थिक दृष्ट्या संपन्न होणाऱ्या चीन या देशाला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे .
सीमेवरील आपल्या जवानांच्या बलिदानाला व्यर्थ जाऊ द्यायचे नसेल तर येथून पुढे जनतेने कुठल्याही चायनीज वस्तूची खरेदी करू नये असे आवाहन मनसे व मनविसे शिरपुर मनसे जिल्हा उपाध्यक्ष राकेश चौधरी व मनविसे जि.उपाध्यक्ष पुनमचंद मोरे मनसे शहर अध्यक्ष चेतन राजपुत यांच्या वतीने करण्यात आले .यावेळी शिरपुर शहरातील मेण रोड वरील पाताळेश्वर मंदिर, शहीद स्मारक जवळ चीन बॉर्डर वर झालेल्या शहीद जवानंना भावपूर्ण श्रध्दांजली देण्यात आली चीनच्या प्रतिकात्मक दहन करण्यात आले. मनसे व मनविसे वतीने जोरदार घोषणा देत चिनी वस्तूंचा बहिष्कार केला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धुळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे,लताताई माळी, स्वयं रोजगार जिल्हा संघटक किरण माळी ,मनविसे शिरपुर ता.अध्यक्ष चेतन पाटील,मनविसे शिरपुर ता.संघटक कैलास बाबर,मनविसे ता.उपाध्यक्ष भटु पाटील,सुरेखा माळी ,प्रतिभा माळी,घनश्याम मराठे,आबीत कुरेशी, अतुल बडगुजर, आनंद पाटील, निलेश पाटील, आप्पा कोळी,जितेंद्र माळी, व कार्यकर्ते उपस्थित होते.