शिरपूर: महाराष्ट्र वीज ग्राहक संघटने तर्फे लाॅकडाऊन काळातील संपूर्ण वीज बिल माफ करण्याची मागणी
शिरपूर: महाराष्ट्र वीज ग्राहक संघटने तर्फे लाॅकडाऊन काळातील संपूर्ण वीज बिल माफ करण्याची मागणी
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि) : कधीही नव्हे अश्या अभूतपूर्व कोरोना महामारीने जगभर घातलेल्या थैमानामुळे आपल्या संपूर्ण भारत देशात सर्वाधिक प्रभावित राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य भयावहरित्या प्रभावित झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीमुळे दिनांक 23 मार्च 2020 पासून लागू झालेले लाॅकडाऊन हे ऑगस्ट 2020 या महिन्यापर्यंत आपला प्रभाव कायम ठेवण्याची दाट शक्यता आहे. तरी लाॅकडाऊन काळ धरून एकूण 6 महिन्यांचे वीज बिल सर्व घरगुती ग्राहक, शेतीपंप धारक , कृषी वीज ग्राहक, लहान मोठे व्यावसायिक, औद्योगिक वीज ग्राहक असे सर्व प्रकारच्या ग्राहकांचे उत्पन्नाचे साधन ठप्प झाले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या ग्राहकांचे वीज बिल सरसकट माफ करावे.अजूनही जनजीवन सामान्य पूर्वपदावर आलेले नाही. तरी एकूण सहा महिन्यांचे वीज बिल माफी देऊन ,सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना जीवन जगण्यास आधार देऊन दिलासा द्यावा .असे निवेदन क्रांतीनगर रोड वरील म.रा.वीज. वि. कं.मर्या.चे मुख्य कार्यालयात उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे शिरपूर तालुकाध्यक्ष गोपाल के. मारवाडी ,तालुका उपाध्यक्ष हेमराज राजपूत, शहर कार्याध्यक्ष हेमंतभाऊ पाटील, शहर अध्यक्ष संजय आसापुरे,शहर उपाध्यक्ष कैलास धाकड, सचिव युवराज पाटील, सह-सचिव मंगेशभाऊ माळी, प्रसिद्धी प्रमुख नंदूभाऊ माळी,सोपान सूर्यवंशी, संदीप पाटील,प्रल्हाद पाटील, राजूलाल मारवाडी,अविनाश शिंपी इ.प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. यावेळी सोशल डिस्टन्स चे भान ठेवून मोजक्याच पदाधिकारी यांच्या उपस्थितीत, शेकडो वीजग्राहकांच्या सहीने निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रति मुख्य अभियंता, दोंडाईचा विभागीय कार्यालय,मा.उर्जा मंत्री सो. महाराष्ट्र राज्य, मा.मुख्यमंत्री सो.महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, प्रकाशगड, मुंबई यांना पाठविण्यात आले आहे.