शिरपूर Lockdown :उद्यापासून या वेळात घेऊ शकणार जीवनावश्यक वस्तु

Featured धुळे
Share This:

शिरपूर (तेज समाचार डेस्क): शिरपूर शहरातील नागरीकादि.२६ एप्रिल २०२० पासून लाॅकडाऊनच्या काळात नागरीकांच्या सुविधेसाठी केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने पुढीलप्रमाणे सुरू राहतील.

१) किराणा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने – सकाळी ८ ते दुपारी २
२) दूध – सकाळी ८ ते दुपारी २
३) भाजीपाला व फळविक्री – सकाळी ८ ते दुपारी २ केवळ हातगाडी/लोटगाडी वरून शहरात फिरती विक्री.
४) औषधांची दुकाने – दिवसभर

नागरीकांनी आवश्यक असेल तरच खरेदीसाठी घराबाहेर पडावे. आपल्या परिसरातील दुकानांमधूनच खरेदी करावी. दुचाकीवर अनावश्यक फिरू नये. मास्क न लावणारे, सोशल डिस्टन्सींग चे उल्लंघन करणारे नागरीक व व्यावसायिक यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कोरोना संक्रमण टाळण्यासाठी घरातच थांबा! सुरक्षित रहा!!

मुख्याधिकारी
शिरपूर वरवाडे नगरपरिषद, शिरपूर

Share This: