शिरपूर: स्व्. खा. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिना निमित्त् वाहिली श्रद्धांजली
शिरपूर: स्व्. खा. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिना निमित्त् वाहिली श्रद्धांजली
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि): येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाचे आश्रयदाते, मुंबई येथील श्री विले पार्ले केळवणी मंडळचे तत्कालीन अध्यक्ष माजी खासदार स्व्. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त सोमवारी दि. 15 जून रोजी सकाळी 9 वाजता आर.सी.पटेल फार्मसी कॅम्पसमधील एस.एम.पटेल ऑडीटोरीअम हॉलमध्ये पटेल परिवार व संस्थेचे संचालक या मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करुन स्व्. खा. मुकेशभाई पटेल यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, केतकीबेन मुकेशभाई पटेल, कृतिबेन भुपेशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई अमरिशभाई पटेल, शिरपूर टेक्सटाईल पार्क चेअरमन तथा नगरसेवक तपनभाई पटेल, रीमा तपनभाई पटेल व मान्यवर यांनी गुलाबपुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली व प्रतिमा पूजन केले.
“हे राम”…….भजन सोबत दु:खमय वातावरणात माजी खासदार स्व्. मुकेशभाई पटेल यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, संचालक बबनलाल अग्रवाल, शिरपूर पीपल्स बँकेेचे चेअरमन योगेश भंडारी, श्री बालाजी संस्थान उपाध्यक्ष गोपाल भंडारी, मर्चंट बँक चेअरमन प्रसन्न जैन, वित्त अधिकारी नाटुसिंग गिरासे, शैलेंद्र अग्रवाल, जी. बी. गुजर, डॉ. डी. आर. पाटील, डॉ. संजय सुराणा, डॉ. संजय बारी, डॉ. वैशाली पाटील, डॉ. एच. वाय. देवरे, जे. एल. चौधरी, नितीन गिरासे, श्यामकांत ईशी, राजू मारवाडी, प्रकाश गुरव, नरेंद्र पाटील यांनीही गुलाबपुष्प वाहून अभिवादन केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्राचार्य आर.बी.पाटील यांनी केले.