शिरपूर: “कोई रोड पर ना निकले “- मुख्य रस्त्यावर अवतरला कोरोना

Featured धुळे
Share This:

शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधी ): देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण आणि झालेल्या मृत्यूची संख्या महाराष्ट्रात आहे. सोमवारी राज्यात ३३ नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये १९, मुंबईत ११, तर अहमदनगर, सातारा आणि वसईमध्ये प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ७८१ वर पोहोचला आहे.

राज्यात कोरोनाचा कहर आहे संचार बंदी सुरू आहे , लॉक डाऊन लागू आहे, जगभरात हजरो लोक मरत आहे, दिवसेंदिवस कोरोना महाराष्ट्र मध्ये चोरट्या पावलाने प्रवेश करून आपला प्रभाव वाढवत आहे. ही बाब आपल्या साठी अत्यंत चिंताजनक आहे. आपल्या जिल्यात किंवा तालुक्यात कोरोना ची लागण होऊ नये या साठी पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग,नगर परिषद, महसूल विभाग,ग्रामपंचायत व इतर सर्व वी विभाग दिवस रात्र एक करून उपाययोजना करत आहेत व लोकांना आवाहन करत आहेत की की सरकारी नियमाचे पालन करा, सोशल डीस्टनस  ठेवा,घरा बाहेर पडू नका मात्र अनेक लोक या आवाहनला प्रतिसाद देत नाही असे लक्षात आले आहे.यात पोलिसांनी नागरिकांना शिस्त लागावी म्हणून प्रसाद दिला, गुन्हे दाखल केले, शहरात फवारणी केली, व्यवसाय साठी नियोजन केले, वेळ ठरवली, जागा ठरवल्या मात्र नागरिक काही ऐकत नाही असे दिसत आहे. कोरोना तालुक्याच्या सीमेवर येऊन गेला आहे.आता जास्त सावधानतेची गरज आहे. अजून काही दिवस  नियम पाळणे आवश्यक आहे  नाही रात्र वैर्याची आहे. नाही तर तालुक्यातील आरोग्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो. अश्या परिस्थितीत जण जागृती साठी शिरपूर महसूल प्रशासनांने एक अभिनव युक्ती लढवली असून शहरातील प्रमुख रस्त्यावर कोरोना- “कोई रोड पर ना निकले “, घरात राहा, सुरक्षित राहा असे पेंटिंग रंगवले आहेत या साठी शहरातील कला शिक्षकाची मदत घेतली आहे. तहसीलदार आबा महाजन यांनी हा उपक्रम सुरू केला असून आता या द्वारे जण जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुले  पेंटिंग रुपी कोरोना शिरपूर च्या रोड वर अवतरलं असून किमान आता तर या पासून बोध घेत लोकांनी सरकारी नियम पाळत सरकार ला सहकार्य करावे व आपला परिवार,  आपले गाव, शहर, जिल्हा, राज्य व देश सुरक्षित राहावं मानून रोड फिरू नये असे आवाहन केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *