RCPIT

शिरपूर: आर सी पटेल अभियांत्रिकी आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारला प्रचंड प्रतिसाद

Featured धुळे
Share This:

आर सी पटेल अभियांत्रिकी आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारला प्रचंड प्रतिसाद

 ६-G टेक्नॉलॉजी व आर्टिफिशियल  इंटेलिजन्स वर मार्गदर्शन
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि): आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ईलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलीकम्यूनिकेशन विभागातर्फे आयोजित रिसेंट ट्रेंड्स इन वायरलेस कम्युनिकेशन ह्या विषयावरील  आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये देश विदेशातील एकूण १८००  संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन  प्रचंड प्रतिसाद दिला असल्याची  माहिती  प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील तसेच या वेबिनारचे समन्वयक  डॉ. तुषार जावरे व डॉ. महेश डेम्बरानी यांनी दिली.
सध्या सुरु असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या परीस्थीतीत शिक्षण क्षेत्रातील सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. लॉकडाऊनच्या निमित्ताने उपलब्ध झालेल्या वेळेचा उपयोग ज्ञानवृध्दी साठी व्हावा म्हणून येथील आर सी पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ईलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलीकम्यूनिकेशन विभागातर्फे *रिसेंट ट्रेंड्स इन वायरलेस कम्युनिकेशन* ह्या विषयावरील आंतरराष्ट्रीय  वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते.
या अंतर्गत अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सध्या ट्रेंडिंग असलेल्या 6G टेक्नोलॉजी व  कृत्रिम बुद्धिमत्ता(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या विषयात जागतिक स्तरावर सुरू असलेले संशोधन व या दोन्ही तंत्रज्ञानामुळे व औद्योगिक, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, वैद्यकीय व दैनंदिन मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामा बाबतीत व्हिएतनाम येथील डूय टॅन विद्यापीठ डा.नांग  येथील वरिष्ठ संशोधक डॉ.आनंद नायर यांनी मार्गदर्शन केले.
 तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सध्या ट्रेंडिंग असलेल्या या विषयातील वेबिनारसाठी देश विदेशातील  १८००  अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला, यात देशातील २३ राज्ये,
४ केंद्रशासित प्रदेश, तसेच जॉर्जिया, इंडोनेशिया, मलेशीया, मालवी, ओमान आणि यु.के. या  देशांमधील अभ्यासकांचा  सामावेश होता.
6G टेक्नोलॉजी व आर्टिफिशियल  इंटेलिजन्स इन  वायरलेस कम्युनिकेशन  मुळे भविष्यात  वैद्यकीय क्षेत्र अधिक तंत्रज्ञान युक्त होऊन कोरोना व त्या सारख्या साथीच्या आजारासह इतर दुर्धर आजारांवर इलाज करणे सहज शक्य असेल याची माहिती या वेबीनार द्वारे विषद करण्यात आली.
प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील व  ई.अॅन्ड टी.सी विभाग प्रमुख डॉ.प्रमोद देवरे यांच्या मार्गदर्शनावाखाली प्रा.डॉ. तुषार जावरे व प्रा.डॉ.महेश डेम्बरानी यांनी या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे प्रमुख समन्वयक म्हणून  परिश्रम घेतले.
महाविद्यालयाच्या ह्या उपक्रमाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक तपनभाई पटेल, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, विभाग प्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल सरोदे, प्रा. जी. व्ही. तपकिरे, जनसंपर्क अधिकारी डॉ.प्रशांत महाजन, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *