
शिरपूर Corona Virus: दुसरा कोरोनाग्रस्त रूग्ण आढळला- जिल्ह्यात आणखी 3 रूग्णांची वाढ
शिरपूर दुसरा कोरोनाग्रस्त रूग्ण आढळला- जिल्ह्यात आणखी 3 रूग्णांची वाढ
धुळे (तेज समाचार डेस्क): करोना विषाणूने धुळे जिल्ह्यात प्रवेश केला असून धुळे शहर ‘हॉट स्पॉट’ बनू लागले आहे. त्यासह जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळी तीन पाॅझिटिव्ह रूग्ण आढळले. ही चिंताजनक स्थिती पाहता नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहन आहे. एक पुरूष व दोन महिला, असे तीन नव्याने पाॅझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची एकूण संख्या १९ झाली आहे.धुळे शहरात आता एकूण १४ बाधित झाले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. साक्री शहर, बाह्मणे (ता. शिंदखेडा), आमोदे (ता. शिरपूर) येथे प्रत्येकी एक रूग्ण होता. आता साक्री शहर व आमोदे येथे प्रत्येकी दुसरा कोरोनाग्रस्त रूग्ण आढळला आहे. यात दोन्ही महिला आहेत. कोरोना बाधित क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची सूचना तालुका प्रशासनासह महापालिकेला मिळाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६ वरून १९ झाली आहे. पैकी पूर्वी साक्रीतील एक व धुळे शहरातील तीन, अशा एकूण चौघांचा मृत्यू झाला आहे.
तपासणी अहवालांची स्थिती
येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात गुरूवारी दिवसभरात १३मजणांच्या शरीरातील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तपासणीअंती पॉझिटिव्ह आलेले ११ रुग्ण सध्या रुग्णालयात दाखल आहेत. अद्याप ५२ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत धुळे शहरासह जिल्ह्यातील १६ जणांचे अहवाल आज सकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार ‘पॉझिटिव्ह’ आहेत.
64 जणांचे थर्मल स्कॅनिंग
सर्वोपचार रुग्णालयात 64 जणांचे ‘थर्मल स्कॅनिंग’ झाले. 22 जणांना होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे. आजअखेर 485 जणांच्या शरीरातील नमुन्यांची तपासणी झाली. तसेच चार हजार 849 जणांची थर्मल स्कॅनिंग झाले. अधिष्ठाता डॉ. एन. एन. रामराजे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आढावा घेत आहेत.