
शिरपूर: बाहेरगावी जाणाऱ्या व्यक्तींसाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांच्या प्रयत्नाने मोफत ई-पास सुविधा केंद्र सुरू
शिरपूर: बाहेरगावी जाणाऱ्या व्यक्तींसाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांच्या प्रयत्नाने मोफत ई-पास सुविधा केंद्र सुरू
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि): शिरपूर तालुक्यातून बाहेरगावी जाणाऱ्या व्यक्तींसाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांच्या प्रयत्नाने शिरपूर येथे आर. सी. पटेल मेन बिल्डिंग येथे मोफत ई-पास सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्याने शिरपूर तालुक्यात अडकून पडलेल्या नागरिकांना सोय करण्यात आली आहे. प्रशासनाने ई-पास अत्यावशक केले आहे. परंतु या महामारीच्या काळात जनतेची होणारी गैरसोय व आर्थिक पिळवणूक लक्षात घेता माजी मंत्री अमरिशभाई पटेल व तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील जनतेसाठी शहरातील आर.सी.पटेल मेन बिल्डींग (पोस्ट ऑफिस समोर) येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नागरिकांना मोफत ई – पास काढण्यासाठी सुविधा केंद्र दि. १३/५/२०२० पासून सुरु करण्यात आले आहे.
तरी जनतेने या सुविधेचा सोशल डिस्टन्सिंग ठेवून लाभ घ्यावा. गरजू नागरिकांनी ई-पास काढण्यासाठी येताना सोबत, ज्या व्यक्तींना बाहेरगावी जायचे आहे त्या सर्वांचे मेडिकल सर्टिफिकेट, ओरिजनल आधार कार्ड, पासपोर्ट फोटो सोबत आणावे असे कळविण्यात आले आहे.