
शिरपूर: व्हर्च्युअल क्लास रूम व ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून आर सी पटेल अभियांत्रिकी तर्फे अभ्यासक्रम मार्गदर्शन
शिरपूर: व्हर्च्युअल क्लास रूम व ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून आर सी पटेल अभियांत्रिकी तर्फे अभ्यासक्रम मार्गदर्शन
धुळे (तेज समाचार डेस्क) : लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात महाविद्यालये बंद असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन विविध अद्ययावत प्राणली व सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करीत येथील आर सी पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने व्हर्च्युअल क्लास रूम व ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ततेसाठी काटेकोर नियोजन करून त्याची अंमलबजावणी मार्च महिन्या पासूनच सुरू केलेली आहे . या मुळे महाविद्यालयतील २४०० विद्यार्थ्यांना सर्व शासकीय निर्बंधांचे पालन करीत आपला अभ्यास घरी राहूनच व्यवस्थितपणे करता येत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी पाटील यांनी दिली आहे .
कोरोंना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होम द्वारे अभ्यासक्रम पूर्ततेसाठी कार्यरत राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शिकणाच्या प्रक्रियेत अडथळा येऊ नये या साठी महाविद्यालयातील प्राध्यापक ऑनलाइन सुविधेद्वारे म्हणजेच मुडल, दृक श्राव्य माध्यमातून लेक्चर्स , युट्यूब चॅनल , व्हाटसअप द्वारे नोट्स , मेलद्वारे प्रेसेंटेशन्स , पिडीएफ नोट्स अश्या विविध प्रकारे विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून अभ्यासक्रम पुढे नेत आहेत. या साठी महाविद्यालयाच्या शिक्षक पालक या उपक्रमाचा मोठा फायदा महाविद्यालयाला या लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात होत असल्याची माहिती प्राचार्यं पाटील यांनी दिली. महाविद्यालयाची online.rcpit/moodle अशी स्वतःची लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम मुडलवर असून त्यावर प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक विषयाचे अभ्यास साहित्य अपलोड केलेले आहे. यात नोट्स, व्हिडिओ , प्रश्नसंच , आदि असून या मुडल द्वारे ऑनलाइन चाचणी परिक्षाही घेतली जाते. या साठी प्रवेश झाल्यानंतर सुरुवातीलाच प्रत्येक विद्यार्थ्याला या मुडल वर रजिस्टर केले जाते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्गनिहाय व्हाट्सअप ग्रुप असून त्यात वर्गशिक्षक व स्थानिक शिक्षक पालक या सह सर्व विषय शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पालकांचाही सामावेश आहे. या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यां पर्यन्त अभ्यास साहित्य पाठवविले जात आहे. या काळात विद्यार्थ्यानी केलेल्या अभ्यासाचे व दिलेल्या गृहपाठाची पडताळणी करण्यासाठी विद्यार्थी शिक्षक पालकांची मदत महत्वाची ठरते आहे . एव्हड्या सर्व प्रकारच्या सुविधा असतांनाही नामवंत अश्या सिस्को कंपनीशी सहकार्यं करार करीत rcp.webex.com संकेतस्थळाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विद्यार्थ्याशी थेट संपर्क साधून लेक्चर्स घेता यावेत या साठी ऑनलाइन दृकश्राव्य सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे . या द्वारे प्रत्येक वर्गाचे प्रत्येक विषयाचे लेक्चर्स घेतले जात असून याचा खूप फायदा होत असल्याचे विद्यार्थ्यांच्या प्रतीसादा वरून दिसून येत असल्याचे प्राचार्य पाटील यांनी सांगितले. महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांनी स्वतचे यु ट्यूब चॅनेल्स सुरू केलेली असून विद्यार्थ्याचा त्यास उत्तम प्रतिसाद आहे.
अभ्यासक्रमा बरोबरच विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील आद्ययावत ज्ञान मिळावे या साठी महाविद्यालयाने सत्राच्या सुरुवातीलाच ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून तांत्रिक प्रशिक्षण देणार्या कोर्सेरा या जगविख्यात समुहाशी सहकार्य करार केलेला आहे . यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यासह प्राध्यापकांनी नोंदणी केलेली होती त्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण देखील सुरू आहे. या लॉकडाउन व संचारबंदीमुळे मिळणार्या वेळेचा स्वविकासा सह ज्ञानवृध्दी साठी वापर व्हावा यासाठी स्वयम, उडेमी, एन पी टी ई एल या प्लॅटफॉर्म वरील मोफत कोर्सेस ला विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्या बाबत महाविद्यालयाद्वारे मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले जात आहेत.
कोरोंना प्रादुर्भावपूर्वीच महाविद्यालयातील अंतिम वर्षातील 375 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कंपनीत नोकरीच्या ऑफर्स मिळालेल्या आहेत. लॉकडाउन व संचारबंदीच्या कालातही महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग झुम व गुगल हॅंगआऊट च्या माध्यमातून विविध कंपंनींच्या अधिकार्यांशी संपर्क साधित असून महाविद्यालयतील उर्वरित विद्यार्थ्यांना कश्या प्रकारे नोकरीची संधि उपलब्ध करून देता येईल या बाबत चर्चा करीत आहे. याचाच परिपाक म्हणून दोन कंपंनींच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्याचे ऑनलाइन इंटरव्हयूव घेण्या बाबत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. सद्यपरिस्थितीचा प्रभाव महाविद्यालयाच्या प्रत्यक्ष कामावर जरी पडला असला तरी सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व पालकांच्या सहाय्याने कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये या साठी महाविद्यालय आटोकाट प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यानी घरात राहूनच आपला अभ्यास सुरू ठेवावा व स्वत:सह परिवाराचीही काळजी घ्यावी असे आवाहन प्राचार्य डॉ जे बी पाटील यांनी केले आहे . लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात महाविद्यालयातर्फे विद्यार्थी हितासाठी राबवविल्या जाणार्या उप्क्रमा बाबत संस्थेचे अध्यक्ष अमरीषभाई पटेल, व्यवस्थापकीय संचालक भुपेशभाई पटेल , उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी , संचालक तपन भाई पटेल यांनी समाधान व्यक्त केले आहे