
शिरपूर : बनावट नोटा छापणार्या टोळीचा पर्दाफाश
शिरपूर : बनावट नोटा छापणार्या टोळीचा पर्दाफाश
धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि ) : बनावट नोटा छापणार्या टोळीचापर्दाफाश करीत शिरपूर शहर व एलसीबी पोलिसांनी कळमसरे (ता.शिरपूर) येथे कारवाई केली. दोनशे रूपयांच्या बनावट नोटा, यंत्रासह साहित्य हस्तगत केले. या कारवाईने खळबळ उडाली असून चार जणांविरूध्द शिरपूर शहर पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बनावट नोटांचा कारखाना असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पेालिस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पेालिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलिसांनी छापा टाकला. कळमसरे येथील एका घरात भारतीय चलनाच्या बनावट नोटा आढळल्या.
घरात संगणक, प्रिटंर, दोनशे रूपयांच्या बनावट नोटा, छपाईचा कागद, कटर, कात्री, काटकोन, स्केल पटटी, अर्धवट छपाईतील नोटा, शाई असलेले कागद, असे साहित्य आढळले. चौकशीअंती तेथे बनावट नोटांची छपाई होत असल्याचे दिसून आले. एकुण ४८ हजार ३६० रूपयांचे साहित्य जप्त केले. एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत पाटील, उपनिरीक्षक किरण बार्हे, संदीप मुरकुटे, रपीक पठाण, गौतम सपकाळे, राहूल सानप, कैलास महाजन, ललीत पाटील, स्वप्नील बांगर, योगेश कोळी, अमीत रणमळे, प्रवीण गोसावी, बापूजी पाटील, पंकज पाटील, टी. एम. गवळी नुतन सोनवणे, प्रतिभा देशमुख आदींनी कारवाई केली. याप्रकरणी संशयित संतोष गुलाब बेलदार, गुलाब बाबू बेलदार, मंगल पंजाब बेलदार (रा. कळमसरे), विनोद उर्प मनोज जाधव (रा. अजनाड बंगला) यांच्याविरूध्द शिरपूर शहर पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस आल्याची कुणकुण संश्यितांना लागली, त्याचवेळी संशयितांपैकी दोघांनी धाव घेत छपाई केलेल्या बनावट नोटा घरातील बेसीनमध्ये टाकल्या. जाळून त्या नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिस चौकशीत ही बाबही उघडकीस आली असता त्यांनी पाहणी केली. तेथे बनावट व अर्धवट जळालेल्या अवस्थेतील नोटा दिसून आल्या, त्याचवेळी संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले.