शिरपूर Corona Virus: मॉर्निंग वॉकचा पोलिसांचा जोरदार झटका- गुन्हा दाखल

Featured धुळे
Share This:

शिरपूर (तेज समाचार डेस्क): कोरोनाचा प्रसार व प्रार्दुभाव रोखण्यासाठी सध्या देश लॉकडाऊन आहे परंतु काही अतिशहाणे लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करतांना दिसून येत आहेत. उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील २९ जणांना मॉर्निंगवॉक चांगलेच महागात पडले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रसार व प्रार्दुभाव थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश लॉक डाऊन केले जिल्हा व राज्य सीमा लॉक केल्या.प्रशासन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाय करीत आहेत तसेच जनजागृती करीत आहे.पण काही लोक कोरोना विषयी व लॉकडाऊन मजाक समजून उल्लंघन करीत आहे. शहरात काम नसतांना फिरत आहेत पोलिसांकडून प्रसाद ही घेत आहेत.जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करतांना दिसत आहे.सकाळी मॉर्निंगवॉकला बाहेर पडत आहेत.

प्रशासनाच्या या प्रयत्नकडे नागरिक दुर्लक्ष करताना दिसून येत असल्याने प्रशासनने कार्यवाहीचा बडगा उगारला असून शिरपूर शहरात मॉर्निंगवॉकला बाहेर पडलेल्या २९ जणांविरुद्ध शनिवारी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.असे असले तरी रविवारी पुन्हा शहरात मॉर्निंगवॉक करतांना दिसले.

काल शिरपूर शिरपूर पोलिसानी भल्या सकाळीच संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कार्यवाही करत सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या व विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 24 जणांना पकडून गुन्हे दाखल केले आहेत. त्या मुळे लोकांना मॉर्निंग वॉक ला जाणे महागात पडले आहे. काल करवंद नाका व परिसरात संचार बंदीचे पालन न करणाऱ्यावर ही कारवाही करण्यात आली आहे. व ही कारवाही अशीच सूर राहणार असल्याचा इशारा पो.नी.हेमंत पाटील यांनी दिला आहे. यात शहरातील पकडलेल्या नागरिकांत  विजय मराठे,विजय वारुडे,अरुण पाटील,शशिकांत बडगुजर,मेहुल पटेल, किशोर माळी,सुनील सोनवणे, मयूर सोनवणे,विवेक सोनवणे,सागर वाघ, आकाश सोनगडे, परवेझ शहा, बाबा शेख,मुझहीद काझी, फईद मन्सुरी,मुस्तफा शहा, तौफिक बागवान,सर्वेश साहनी, राकेश चौधरी इ चा समावेश आहे

यापुढे लॉक डाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध सक्ती करून कारवाई कार्यवाही करण्यात येणार असल्याचे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *