RCPIT SHIRPUR

शिरपूर: आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्वायत्तते कडे वाटचालयुजीसी गठीत समितीची भेट

Featured धुळे
Share This:

शिरपूर: आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्वायत्तते कडे वाटचालयुजीसी गठीत समितीची भेट

 

शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि) : येथील आर.सी.पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयास दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे गठीत स्वायत्तता समितीने (Autonomous Committee) नुकतीच भेट दिली. समितीने महाविद्यालयातील मूलभूत तसेच शैक्षणिक सोइसुविधा यासह कला ,क्रीडा, प्लेसमेंट, विद्यार्थ्यांचे निकाल, संशोधन या सह सामाजिक तांत्रिक आदी क्षेत्रात महाविद्यालयाने केलेल्या उल्लेखनीय कार्याचे परीक्षण करून समाधान व्यक्त केल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील यांनी सांगितले. दोन दिवस चाललेल्या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेतून तसेच समिती सदस्यांच्या प्रतिसादावरून ते महाविद्यालयाची स्वायत्ततेसाठी शिफारस करतीलच असा आत्मविश्वास डॉ.पाटील यांनी व्यक्त केला.


अवघ्या २० वर्षे या अल्प काळात दर्जेदार व अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा व गुणवत्ता पूर्ण शिक्षण यांच्या बळावर येथिल आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाने राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला आहे . याचेच पुढचे पाऊल म्हणून महाविद्यालयाने विद्यापीठ अनुदान आयोगा कडे स्वायत्तते साठी प्रस्ताव सादर करून त्यादृष्टिने तयारी पूर्ण केली होती. याच अनुषंगाने युजीसी द्वारे गठीत स्वायत्तता समितीने (Autonomy Committee) दि. ११ ते १२ डिसेंबर रोजी महाविद्यालयास भेट दिली. यात समिती अध्यक्ष म्हणून गुरु जम्बेश्वर युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अंड टेक्नोलॉजी, हिसार चे कुलगुरू प्रा. डॉ. तंकेश्वर कुमार, समितीचे व्यवस्थापक व युजीसी प्रतिनिधी म्हणून डॉ. रमेश वर्मा, बी. एम. एस. कोलेज ऑफ इंजिनियरिंग, बास्वन्गुडी, बेंगळूरू येथील प्रा. एम. आर. भगवानसिंग, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालय च्या, नाशिक विभागाचे सह संचालक श्री डी. पी. नाथे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठाचे प्रतिनिधी प्रा. डॉ. एच. डी. पाटील यांचा सदस्य म्हणून सामावेश होता. या वेळी संस्थचे अध्यक्ष आ. अमरिषभाई पटेल व उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी याच्याशी समितीने चर्चा करून शिरपूर एज्युकेशन सोसायटी व विलेपार्ले केलवणी मंडळा च्या शैक्षणिक कार्याची माहिती जाणून घेत तेथील भव्य व दर्जेदार तसेचअत्याधुनिक सुविधा विषयी कौतुक व्यक्त केले. संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनीही समितीस महाविद्यालयाच्या कामकाजाचा पॅटर्न व विकासाचा आराखडा कसा असेल याची माहिती दिली.


समितीच्या सदस्यांनी दोन दिवसीय भेटी दरम्यान महाविद्यालयातील मूलभूत व शैक्षणिक सुविधांचे प्रत्यक्ष निरीक्षण व परीक्षण केले. यात विविध शाखा व विषयांच्या अद्ययावत उपकरणयुक्त प्रयोगशाळा, वातानुकूलित स्मार्ट क्लासरूम, परीक्षा विभाग, कार्यशाळा, लायब्ररी, कॉम्प्युटर सेंटर, लॅंग्वेज लॅब आदींची सखोल पाहणी करून स्वायत्त दर्जा मिळविण्यासाठी महाविद्यालयाची क्षमता ,तयारी आणी तत्परता जाणून घेतली. महाविद्यालय तंत्रशिक्षण क्षेत्रात सातत्याने नाविन्यतेसह उत्कृष्ट अध्ययन आणि अध्यापन पद्धतीसाठी सुपरिचित असून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी सलग्नित असे पर्यंत महाविद्यालयांस विद्यापीठातर्फे सातत्याने‘ अ ’ श्रेणी प्रदान करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये महाविद्यालयाने अतिशय प्रतिष्ठेच्या नॅक(NAAC) या मानांकन व मूल्यांकन प्रक्रियेत प्रथम प्रयत्नातच’ अ ’ श्रेणी मिळविली. या परिसरात नॅक ची ‘अ’ श्रेणी असलेले प्रथम व एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय असा बहुमान प्राप्त केला. सध्या २०१७ पासून महाविद्यालय राज्यशासनाने स्थापित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठाशी संलग्नित आहे. या दोन विद्यापीठांमधील चमकदार कामगिरी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना असलेला शैक्षणिक व निरनिराळ्या प्रशासकीय , व्यास्थापिकीय कामांचा अनुभव स्वायत्तते साठी उपयुक्त ठरेल असा विश्वास सर्व कर्मचाऱ्यांनी समितीस दिला. समितीने विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी सखोल चर्चा करून महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्राप्त करवून घेण्यामागील उदिष्टांची आणि भविष्यातील योजनांची चर्चा केली. विद्यार्थ्यांचे विद्यापीठीय परीक्षांतील निकाल, सुवर्ण पदके, गुणवत्ता यादीतील स्थान याची पाहणी केली. शिक्षक वर्गाची गुणवत्ता आणि संशोधन कार्य यासह महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणारे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती घेतली.


समितीने महाविद्यालयातील सोईसुविधा तसेच सर्वच विभागातील कामकाजविषयी समाधान व्यक्त केले असून स्वायत्तते साठी ती नक्कीच शिफारस करेल असा आत्मविश्वास प्राचार्य डॉ. जे बी पाटील यांनी व्यक्त केला आहे.

शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल , सचिव प्रभाकर चव्हाण , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी समितीच्या यशस्वी भेटी च्या नियोजनाबद्द्ल महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले . या भेटीच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.प्रमोद देवरे, विभाग प्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. डॉ.नितीन पाटील, प्रा. प्रवीण सरोदे , प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *