
वादळी वाऱ्यासह गारपीट मुळे “शिरपूर कोल्ड स्टोरेज अँड वेअर हाऊस” चे 70 ते 80 लाखांचे नुकसान
शिरपूर (तेज़ समाचार प्रतिनिधि ): अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह गारपीट यामुळे गेल्या तीन दिवसापूर्वी आलेल्या अचानक मोठ्या नैसर्गिक संकटामुळे शिरपूर तालुक्यातील अजंदे खुर्द शिवारातील “शिरपूर कोल्ड स्टोरेज अँड वेअर हाऊस” चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शिरपूर तालुक्यातील अजंदे खुर्द येथे डॉ. संजय सुराणा, तुषार जैन व हाजी सत्तार तेली यांच्या मालकीचे शिरपूर कोल्ड स्टोरेज अँड वेअर हाऊस आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारच्या मालाची साठवणूक करण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कोल्ड स्टोरेज च्या बिल्डिंगचे फार मोठे नुकसान झाले. तसेच कोल्ड स्टोरेज मध्ये साठवण्यात आलेल्या मालाचे देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकूण 70 ते 80 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.
शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. येथील नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून तातडीने मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.