
शिरपूर: गळा चिरुन युवकाची नृशंस हत्या
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि): शिरपूर तालुक्यातील जुने भामपूर गावात युवकाचा गळा चिरून खून झाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली.
पोलिस अधिकारी गावात दाखल
मृत युवकाचे नाव विनोद सतीलाल देवरे (38) , तो आज पहाटे गावातील खळ्यात म्हशीचे दूध काढण्यासाठी गेला होता. त्याला घरी परतण्यास उशीर झाल्याने कुटुंबीय शोधण्यासाठी गेले असता त्यांना विनोदचा मृतदेह आढळला. त्याच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याच्या खुणा आहेत. हे कृत्य कोणी केले याचा शोध घेण्यासाठी शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी गावात दाखल झाले.