शिरपूर: कोरोना लढ्यात वीटभट्टी चालकाचा पुढाकार एका दिवसाचे उत्पन्न मुख्यमंत्री अन् पंतप्रधान सहायता निधीत जमा

Featured धुळे
Share This:

शिरपूर: कोरोना लढ्यात वीटभट्टी चालकाचा पुढाकार एका दिवसाचे उत्पन्न मुख्यमंत्री अन् पंतप्रधान सहायता निधीत जमा

शिरपूर (तेज़ समाचार प्रतिनिधि ): तालुक्यातील लौकी गावातील वीटभट्टी चालकाने आपल्या वीटभट्टीमधून मिळणार्‍या उत्पन्नापैकी एका दिवसाचे उत्पन्न दहा हजार रुपये तहसीलदार आबा महाजन यांच्याद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहायता कोषात (प्रत्येकी पाच हजार रुपये) नुकतेच सुपूर्द केले. अशा संकटात अन्य बांधकाम व्यावसायिकांनीही मदतनिधी देण्याचे आवाहन गणेश पाटील यांनी केले आहे.

बांधकाम व्यवसायिकांनाही मदतीचे आवाहन

कोरोनामुळे देशातील जनजीवन ठप्प झाले आहे. देशभरात प्रदीर्घ लॉकडाऊन असल्यामुळे देशाचे आर्थिक नियोजन ढासळू नये, ते सशक्त व्हावे, सरकारला योग्य त्या आवश्यक उपाययोजना करता याव्यात आणि कोरोनापासून सर्व नागरिकांचे संरक्षण व्हावे. यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आपल्या वीटभट्टीमधून मिळणार्‍या उत्पन्नापैकी एका दिवसाचे उत्पन्न मदत निधीत जमा केल्याने मनस्वी आनंद झाल्याचे गणेश पाटील यांनी सांगितले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *