शिरपूर ब्रेकिंग: येथील हवाई प्रशिक्षण केंद्राचे विमान कोसळले

Featured धुळे
Share This:

जळगाव (तेज समाचार डेस्क): चोपडा तालुक्यातील वर्डी गावानजीक नवीन प्रशिक्षण विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक प्रवासी ठार झाला आहे. तर एक महिला वैमानिक गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली. शिरपूर येथील हवाई प्रशिक्षण केंद्राचे विमान सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वर्डी गावापासून उत्तरेच्या दिशेला 7 कि.मी. अंतरावर जंगलात दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास आकाशात घिरट्या घालत होते. ते राम टेकडी परिसरात अचानक कोसळले. प्रचंड आवाज झाल्याने या परिसरातील आदिवसी बांधव व वर्डी गावातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशिक्षण विमानमध्ये दोन जण होते. दोन्ही प्रशिक्षणार्थी पायलट होते. ते मध्यप्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती मिळाल आहे.

यामध्ये एक जण ठार तर महिला पायलट गंभीर जखमी झाली होती. प्रशिक्षण विमानमध्ये ती अडकली होती. ग्रामस्थांनी तिला बाहेर काढले व रुग्णवाहिकेतून तिला चोपड्याला उपचारासाठी हलवले आहे. या प्रशिक्षण विमानमध्ये एकूण दोनच जण होते. सरावा दरम्यान हे हेलिकॉप्टर कोसळले असल्याची माहिती मिळत आहे.


 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *