ब्रेकिंग : शिरपूर-दोंडाईचा मध्ये कोरोना विस्फोट, 19 नवे रुग्ण मिळाल्याने खळबळ
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि). संचारबंदी मध्ये मिळालेल्या सवलतीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे. – जिल्हा करोना नोडल अधिकारी, धुळे डॉ. विशाल पाटील यानी जाहिर केलेल्या अहवालानुसार आज शिरपुरात 10 तर दोंडाइचा मध्ये 9 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. दोन्ही जागी एकुण 19 रुग्ण मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अहवालानुसार उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील २४ रुग्णांची रिपोर्ट आली आहे, त्यामध्ये १० अहवाल पॉजिटिव्ह मिळाले आहे. या मध्ये गोविंद नगर मध्ये 21 वर्षीय महिले सोबतच 30, ४७ आणि 25 वर्षीय पुरुष मिळाला आहे. बौद्धवाडा खालचे गावामध्ये 36 वर्षीय स्त्री, 3६ वर्ष पुरुष आणि 17 वर्षाचा एक मुलगा संक्रमित आढळला आहे. अंबिका नगर मध्ये 7 वर्षाची मुलगी आणि 16 वर्षाचा एक मुलगा संक्रमित मिळाला आहे आणि २२ K G रोड मध्ये एक स्त्री अशी 10 लोक आज कोरोना संक्रमित मिळाली आहे.
– उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथिल १५ अहवालांपैकी ९ अहवाल पॉजिटिव्ह
1. स्त्री/७४ वर्ष डालडा मिल
2. स्त्री/६3 वर्ष डालडा मिल
3. स्त्री/33 वर्ष डालडा मिल
4. स्त्री/४४ वर्ष डालडा मिल
5. पुरुष/२५ वर्ष डालडा मिल
6. मुलगा/ ११ वर्ष डालडा मिल
7. मुलगा/१७ वर्ष राणीपुरा
8. पुरुष/२५ वर्ष दाभरी
9.पुरुष /५० वर्ष दाभरी