
शिरपूर: कोरोनाबाधित रुग्णांना रक्ताची मदत होणार : भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी
शिरपूर: कोरोनाबाधित रुग्णांना रक्ताची मदत होणार : भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी
भाजयुमो तर्फे रक्तदानाचा चांगला उपक्रम
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि मनोज भावसार) : महामारी बाधित रुग्णांना रक्ताची गरज भासणार असुन कोणी रुग्ण रक्तापासुन वंचित राहु नये यासाठी भा. ज. युवा. मोर्चाने रक्तदान शिबीराचे आयोजन करुन एक चांगला उपक्रम राबविला असुन यामुळे कोरोना महामारी मधील रुग्णासाठी मदत होणार आहे असे प्रतिपादन धुळे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले. भारतीय जनता युवा मोर्चा व तपनभाई युवा मंच शिरपूर तालुका तर्फे होळनांथे येथे (दि.21 जुन) रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उदघाटन भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. शिबीराच्या अध्यक्षस्थानी शिरपूर कृउबा समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया हे होते. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, जि. प माजी उपाध्यक्ष के. डी. पाटील, जि. प. सदस्य प्रा. संजय पाटील, पं.स. उपसभापती सौ. धनश्री बोरसे, पं.स. सदस्या सौ. लताबाई राजपूत, भाजपा तालुका सरचिटणीस देवेंद्र राजपूत, उपाध्यक्ष सुरेंद्र राजपूत, अंजदे सरपंच चंद्रकांत पाटील, पिळोदा उपसरपंच योगेश बोरसे, नांथेचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र राजपूत, डाॅ. पुथ्वीराज पाटील, डाॅ. किशोर जैन, डाॅ. पवन पाटील, डाॅ. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना वायरसच्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाचा सर्व स्तरावर प्रयत्न चालु आहेत आपण देखील मानवता धर्म पाळत रक्तदान करुन मानवता समाजसेवा करावी या उद्देशाने भारतीय जनता युवा मोर्चा व तपनभाई पटेल युवा मंच शिरपूर व होळ, नांथे, अजंदे, पिळोदा ग्रा. पं. तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबीरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्दितीय कार्यकाळातील प्रथम वर्षपुर्ती निमित्त मोदी सरकारने केलेल्या कामाची माहिती पत्रके वाटप करण्यात आलीत. यावेळी परिसरातील समाजसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीरात आपला सहभाग नोंदविला. कोरोनाग्रस्त रुग्णाना मदत कार्यासाठी हि संकल्पना राबवण्यात आली होती. रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी विरपाल राजपुत, तनवीर शिंपी, कैलास मराठे, दयानंद पवार, रविंद्र सपकाळे, मच्छिंद्र कुंभार, जयेश सोनगीरे, तुळशीराम मराठे, दिलीप प्रजापती, अविनाश भोई, राहुल भोई, दिपक ढोले, उमेंद्र राजपुत, जाकिर खाटीक, प्रमोद राजपुत, दिपक झाल्टे, पिंटु सोमवंशी, अर्जुन कोळी, वासुदेव राजपूत, करीम शेख, नगीनदास कोळी, योगेश मिस्तरी तसेच होळ, नांथे, अंजदे ग्रामस्थ आदिंनी अथक परिश्रम घेतले.