
लाॅकडाऊन काळातील वीजबील पुर्णपणे माफ करावे शिरपूर भाजपाची मागणी
भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा उपस्थितीत अधिकार्यांना निवेदन
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि): कोरोना या विषाणुमुळे जगभरात पसरलेल्या माहामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व जनतेला मृत्युपासुन वाचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार मार्च महिन्यापासुन लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. या कालावधीतशेती, औद्यगिकसह सर्व प्रकारचे व्यवसाय ठप्प झालेत. अनेकांना रोजगारापासुन वंचित राहावे लागले. शेतकरी, व्यापारी, छोटे दुकानदार, फेरीवारी, मजुर, नागरिक अशा सर्वच घटकांच्या दैनंदिन जीवनावर याचा मोठा परिणाम झाला, असुन आर्थिक मंदीचे सर्वत्र सावट निर्माण झाले आहे. म्हणुन शिरपूर शहर सह तालुक्यातील वीज ग्राहकांचे लाॅकडाऊन काळातील विजबील माफ करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विज मंडळाचे उपकार्यकारी अभियंता नेमाडे, राजपुत यांना शिरपूर शहर व तालुका भाजपा तर्फे देण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, पं स. सभापती सत्तारसिंग पावरा, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस संजय आसापूरे, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, प्रशांत राजपूत, शहर चिटणीस अविनाश शिंपी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमराज राजपुत, तालुका उपाध्यक्ष अनिल गुजर, शहराध्यक्ष विक्की चौधरी, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष नंदु माळी, माजी शहर सरचिटणीस सुनिल चौधरी, वाल्मीक नगर शाखाध्यक्ष हिरालाल कोळी, राज सिसोदिया, मनोज राजपूत आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनाची प्रत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, कार्यकारी अभियंता दोंडाईचा यांना ही पाठवण्यात आली आहे. निवेदनात लाॅकडाऊन काळात कामधंदा बंद होता त्यामुळे कामगार, मजुर, शेतकरी व नागरीक यांच्या हातात पैसा नाही म्हणुन विज बीले भरण्याची क्षमता राहिलेली नाही याची दखल शासनाने व वीजमंडळाने घेवुन शिरपूर शहर व तालुक्यातील लाॅकडाऊन दरम्यानचे घरगुती, व्यवासायिक, औद्यागिक, कृषी पंपाची विजबीले पुर्णपणे माफ करुन ग्राहकांना दिलासा द्यावा व यासंदर्भातील निर्णय होईपावतो ग्राहकांकडुन बील भरण्याची सक्ती करण्यात येवु नये अशी मागणी करण्यात आली आहे.