शिरपूर : महामार्गावर उभ्या कंटेनर वर खाजगी प्रवासी बसच्या धडकेत 34 जण जखमी झाले. 5 प्रवासींची प्रकृती गंभीर.
धुळे मुंबई-आग्रा महामार्ग राष्ट्रीय क्रमांक तीन वर दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान एक मोठा भीषण अपघात झाला.
धुळे येथील शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर सांगवी गावाजवळील ओम पेट्रोल पंप समोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनर वर इंदौरहुन शिर्डी कडे जाणाऱ्या खाजगी प्रवासी बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस जोरदार यात एकूण 34 प्रवासी होते प्रवासी जखमी झाले अपघाताची माहिती शिरपूर तालुका पोलीस सपोनि अभिषेक पाटील यांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील जखमी प्रवासी बाहेर काढून उपचारार्थ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले यातील पाच जखमींची प्रकृती खालावल्याने तातडीने त्यांना धुळे येथील चक्कर बर्डी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात बसच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती दोन्ही वाहने क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
अपघाताबाबत उशिरापर्यंत शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.