
शिरपूर : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कार्यवाही
शिरपूर : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कार्यवाही
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधी):गेल्या दीड महिन्यांत हजारो लोकांचे प्राण वाचवण्यात देशाला यश आले असून लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम झाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. परंतु आज शिरपूर शहरात महसूल प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांनी संयुक्तरित्या कारवाई करत शिरपूर शहरातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली आहे. शिरपूर शहरालॉक डाऊन च्या काळात जीवनावश्यक वस्तू ,किराणा दुकान ,दूध ,भाजीपाला, फळे विक्रीकरिता सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे या कालावधी व्यतिरिक्त आदेशाचा भंग करणाऱ्या व स्थापना चालू ठेवणाऱ्या दुकानदारां वर शिरपूर नगर परिषद व शिरपूर तहसील कार्यालय यांनी 27 एप्रिल रोजी संयुक्तरित्या कार्यवाही केली असून या कार्यवाहीत
शिरपूर शहरातील साक्रीया उपहारगृह ,ए.जी गुप्ता किराणा, महावीर स्वीट जनरल, साई कृपा प्रॉव्हिजन, साई ऍग्रो सर्विसेस, आर के सम्राट, खुशी किराणा, वसीम शेख करीम, संजय कुमार सुमतीलाल लाल जैन, इत्यादी दुकानांवर कार्यवाही करण्यात आली आहे नागरिक व व्यवसायिक यांना लॉक डाऊन च्या काळामध्ये सुरक्षित अंतराचे पालन करणे, मास्क लावणे बंधनकारक केलेले असून प्रशासनाने दिलेले नियम पाळण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले आहे मात्र तरीदेखील नागरिक आणि व्यवसायिक नियमांचे उल्लंघन करत असल्याबाबत निदर्शनास आले आहे त्यामुळे सदरची कार्यवाही करण्यात आली आहे असे मुख्याधिकारी व आबा महाजन सो यांनी सांगितले आहे आजच्या कारवाईमध्ये मुख्याधिकारी अमोल बागुल , तहसीलदार आबा महाजन, दीपक मराठे, भरत ईशी, भटू माळी, कैलास सजन पाटील, संजय बारी इत्यादी कर्मचारी उपस्थित होते याशिवाय कोरोना संकटकाळात नागरिकांनी शहरातील होम डिलिव्हरी योजनांच्या लाभ घ्यावा व घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे