
शिरपूर: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानावर कारवाई
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधी): कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहून राज्य सरकार लॉकडाऊन निर्णय घेतले आहे. गेल्या दीड महिन्यांत हजारो लोकांचे प्राण वाचवण्यात देशाला यश आले असून लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम झाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले। शिरपूर शहरात लाकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणि कृषीविषयक साहित्यांची दुकाने सकाळी आठ ते दुपारी दोन या कालावधीपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
केली संयुक्त कारवाई
या काळात जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर दुकाने उघडणाऱ्या दुकानदारांवर ती आज दि.29 एप्रिल 2020 रोजी शिरपूर नगर परिषद आणि शिरपूर तहसीलदार कार्यालय यांनी संयुक्त कारवाई केली.
या कारवाईमध्ये एक कापड दुकान आणि दोन कटिंग सलून सील करण्यात आले आहेत आणि इतर सहा दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. या पुढे दुकानदार यांनी नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.