
शिरपूर 7 दिवस जनता कर्फ्यू
शिरपूर (तेज समाचार डेस्क): शिरपूर शहरातील कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी शहरातील जनतेच्या विनंतीवरून व राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी यांच्या विनंतीवरून शिरपूर वरवाडे नगरपरिषद क्षेत्रात
रविवार दि. २८ जून २०२० ते शनीवार दि. ४ जुलै २०२० असे सात दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात येत आहे.
या काळात दवाखाना आणि त्यांच्याशी संलग्न मेडीकल स्टोअर्स चालू राहतील. इतर मेडीकल स्टोअर्स व कृषी विषयक दुकाने सकाळी ८ ते १२ या काळात चालू राहतील. दूध डेअरी सकाळी ७ ते ८ व संध्याकाळी ६ ते ७ या काळात चालू राहतील.
इतर सर्व दुकाने बंद राहतील.
नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. मास्कचा वापर करावा. हात दिवसभरात सात ते आठ वेळा साबणाने स्वच्छ धुवावे. एकमेकांमध्ये कमीत कमी पाच फूट अंतर ठेवावे.
आरोग्य पथकास खरी माहिती देऊन सहकार्य करावे.
कोरोनाची संक्रमण साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू चे काटेकोर पालन करावे.
मा. प्रांताधिकारी, शिरपूर
मा. पोलीस उपविभागीय अधिकारी, शिरपूर
मा. तहसीलदार, शिरपूर
मा. पोलीस निरीक्षक, शिरपूर
मा. मुख्याधिकारी, शिरपूर