शिरपूर : आणखी 2 कोरोना बाधित आढळले , रूग्णांची संख्या 14

Featured धुळे
Share This:

शिरपूर : आणखी 2 कोरोना बाधित , रूग्णांची संख्या 14

शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि) : एकेकाळी ग्रीन झोन मध्ये असलेला शिरपूर आज हळू-हळू कोरोनाच्या विळख्यात अडकत जात आहे. आज पुन्हा शिरपूर शहरात 2 अजून रुग्णाची भर पडली आहे. शिरपूर तालुक्यात करोनाचे रुग्ण वाढत असून जिल्हा रुग्णालय धुळे येथील आलेल्या २३ अहवालानुसार  उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील  २ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. सदरील व्यक्ती हे दि.२५ पॉजिटिव्ह आलेल्या पाटीलवाडा शिरपूर येथील रुग्णाच्या संपर्कातील ७१ वर्ष  पुरुष व ६९ वर्ष वयाची महिला आहेत. दोन्ही रुग्ण उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे ऍडमिट आहेत.
जिल्हयातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या १२० झाली आहे़.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *