शिरपूर: दहावी परीक्षेत तांडे CBSE स्कूलचा 100 टक्के निकाल

Featured धुळे
Share This:

शिरपूर: दहावी परीक्षेत तांडे CBSE स्कूलचा 100 टक्के निकाल

शिरपूर (तेज समाचार डेस्क): श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई संचालित तांडे (ता. शिरपूर) येथील मुकेश आर. पटेल सीबीएसई स्कूलचा दहावीचा १०० टक्के निकाल लागला. विद्यालयातून ५३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, यापैकी ८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळविले. २० विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळविले. मिहीर संघवी याने ९८.४० टक्के मिळवून प्रथम, सार्थक जैन ९८.२० द्वितीय, चांदणी जैन ९८.२० टक्के द्वितीय, दीक्षिता हुरेज ९७.८० तृतीय, खुशी रुपदा ९७.२० चतुर्थ, प्रमोद क्षीरसागर ९४ पाचवा, घनश्याम सिसोदे ९३.४० सहावा, हंसल जाधव ९२.४० सातवा, गौरव शिरसे ८९.४० आठवी, विश्वजीत पाटील ८९.४० नववा, मुकुल पटेल ८८.६० दहावा, कार्तिकेय भसीन ८८.४०, कृष्णा चौधरी ८८.४०, दर्शन पटवारी ८८, स्वरूप पाटील ८७.६०,श्याम पवार ८७.००, पियुष नेरकर ८६.२०,लीची जैस्वाल ८४.६० गुण मिळविले. गणित विषयात मिहीर संघवी आणि सार्थक जैन यांनी १०० पैकी १०० गुण मिळविले. तर चांदणी जैन व दीक्षिता हुरेज यांनी विज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले. मिहीर संघवी व रुपदा यांनी सामाजिकशास्त्र याविषयात खुशी ९९ गुण मिळविले. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य पी. सुभाष व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, स्कूल संचालिका गीरीजा मोहन, शाळेचे प्राचार्य डॉ.पी.सुभाष यांनी कौतुक केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *