
शिरूड ATM चोरी मामला : बेवारस स्थितीत आढळली पिकअप व्हॅन!
धुळे (विजय डोंगरे ): तिखी शिवारातील डोंगराळ भागात रस्त्यावर बेवारस स्थितीत आढळली पिकअप व्हॅन.
शिरूड गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेच्या खालील गळ्यात लाखोंच्या रोकड सह असलेले एटीएम मशीन शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शिताफीने साखळीने तोडून एका महेंद्र पिकअप मध्ये टाकून चार चोरट्यांनी ते लंपास केले होते आज रविवारी दुपारी दीडच्या सुमारास चोरट्यांनी चोरीसाठी वापरलेली पिकअप व्हॅन ही तिखी शिवारात जवळील डोंगराळ भागाच्या बाजूला रस्त्यावर बेवारस स्थितीत आढळून आली. परंतु त्यात एटीएम मशीन नव्हते पोलिसांना ही माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत परिसरातील व वाहनांची पाहणी केली त्यात एटीएम मशीन पोलिसांना मिळाले नाही पिकअप व्हॅन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सीसीटीव्हीच्या आधारे चार चोरट्यांचा तपास सुरू आहे काल नाकाबंदी करूनही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरटे शिताफीने पसार झाले होते त्यानंतर आज फक्त पिकअप व्हॅन पोलिसांना बेवारस स्थितीत मिळाली. एटीएम मशीन व त्यातील लाखोंच्या रोकडचा अद्यापही तपास लागलेला नाही.