
शिंदखेडा चोरट्यांनी घराच्या छताचा गज वाकून हजारो किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले
धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि):धुळे तालुक्यातील गावात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच शिंदखेडा गावातील भर चौकातील घर फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून हजारो रुपयांचा चांदीचा ऐवज लंपास केला.
सविस्तर माहिती की, शिंदखेडा गावातील पंचायत चौकातील घर नंबर 10 72 मध्ये राहणाऱ्या राम देवेंद्र जोशी हे सुनेची तब्येत बरी नसल्याने औषध घेण्यासाठी परगावी गेले होते याच दरम्यान अज्ञात चोरट्याने छतावरील झरोक्यातील लोखंडी गज वाकून घरात प्रवेश करून घरातील कपाट फोडून कपाटातील पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व चैन मंगळसूत्र, तीस हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने,ताट, वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण 65 हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला.
बाहेरगावाहून जोशी कुटुंब घरी परत आले असता घरातील साहित्य जमिनीवर फेकलेले दिसले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की घरात चोरी झाली. त्यांनी शिंदखेडा पोलिसांना चोरी झाली याबाबत माहिती दिली.माहिती मिळताच शिंदखेडा पोलिस यांनी घटनास्थळी भेट देवून पाहाणी केली.जोशी यांनी पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार नोंद केली त्यानुसार शिंदखेडा पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास पोसई सुशांत वळवी करत आहे.