
तिला फक्त 3 मिनिटे वडिलांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी
तिला फक्त 3 मिनिटे वडिलांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी
मनिपूर (तेज समाचार डेस्क): कोरोना संशयित असलेल्या मुलीला इम्फाळ येथील क्वारटाइन सेंटरमध्ये ठेवले होते. याचवेळी दीर्घ आजाराने तिच्या वडिलांचे निधन झाले. यावेळी मनिपूर येथील तिच्या घरी तिला आणले, पण वडिलांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी तिला फक्त तीन मिनिटे देण्यात आली होती.
तरुणी आपल्या वडिलांचं अंत्यदर्शन घेत असल्याचा ह्रदयद्रावक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. वडिलांच्या मृतदेहाजवळ जाऊन त्यांना निरोप देत असताना तिची आई, नातेवाईक किंवा शेजारी कोणालाही तिच्या जवळच जाण्याची परवानगी नव्हती. मुलगी समोर धाय मोकलून रडत असताना तिच्या आईकडे मात्र पाहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. यावेळी डॉक्टरांचं सर्व लक्ष मात्र घड्याळाकडे होतं. तीन मिनिटं पूर्ण होताच डॉक्टरांनी तरुणीला तेथून हलवलं.