
शिरपूरात तुफान गारपिटीमुळे घर कोसळून एक ठार तर तीन जखमी
शिरपूरात तुफान गारपिटीमुळे घर कोसळून एक ठार तर तीन जखमी.
शिरपुर(तेज़ समाचार प्रतिनिधि): जिल्ह्यातील शिरपूर गावात मंगळवारी सायंकाळच्या तुफान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी घरांचे छतावरील पत्रे उडाले पेट्रोल पंपावर छताचे पत्रे उडाले आहेत रस्त्यावरील झाडे, वीज खांब कोसळून मोठे नुकसान झाले आहे.शेतात पिकावर गारांचा मारा झाल्याने पिके वाकून मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.
तीन दिवस गावात विद्युत पुरवठा खंडित राहील असे वीज वितरण अभियंता यांनी सांगितले या दरम्यान शिरपूर गावातील एक जुने घर कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून राजेंद्र माळी यांचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झाले आहे त्यांना तातडीने उपचारार्थ ग्रामिण रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.शिरपूर पोलीस स्टेशन आवारात उभ्या असलेल्या पोलीसांच्या गाडीवर झाड उन्मळून पडले.गारपिटीत गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत.
पाऊस थांबल्याने रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडे,वीज खांब,तारा बाजूला करण्यासाठी जे.सी.बी.मशीन व नगरपालिका कर्मचारी मदत घेण्यात येत आहे.नागरीक हि मदतीसाठी पुढाकार घेत आहेत.
प्रशासनाच्या वतीने तातडीने मदत कार्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु अंधार असल्यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहे.