महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपला यश मिळणार नाही : शरद पवार

Featured मुंबई
Share This:

 

मुंबई (तेज समाचार डेस्क).  भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडण्यात कधीच यश मिळणार नाही असं महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. आधी त्यांना दोन महिन्यात ठाकरे सरकार पाडायचं होतं. नंतर सहा महिन्यात सरकार पाडणार होते. नंतर पुन्हा आठ महिन्यात सरकार पाडणार होते. पण काहीच झालं नसल्याचं म्हणत शरद पवारांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.

ठाकरे सरकारने एक वर्ष पूर्ण केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचंही पवार म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारमधील नेत्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवरही आपलं मत व्यक्त केलं. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना देण्यात येणाऱ्या ईडीच्या नोटिसा म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याचं शरद पवार म्हणाले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *