
मुस्लीमांमध्ये संघाविरोधात द्वेष निर्माण करणाऱ्यांना शरम वाटली पाहिजे!
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक जनकल्याण समिती, मुंबई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे मुंबईतील गरजू व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, शहरात अडकलेले मजुर आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांना या कठीण प्रसंगी मदत करत आहे. स्वयंसेवकांमार्फत सुरु असणाऱ्या या मदतकार्याला वय, भाषा, जाती आणि धर्माच्या कोणत्याही सीमा माहित नाही. स्वयंसेवकांच्या या निःस्वार्थ कृतीमुळे स्वामी विवेकानंदांचा आदर्श पुन्हा दिसून आला कि, ‘तुम्ही ज्या माणसाची मदत केली त्याबद्दल कृतज्ञता बाळगा, त्याच्यात देव माना.’
ज्याकाळात रा स्व संघाबद्दल जातीयवादी असल्याच्या समज काही घटकांकडून समाजात पसरविला जात आहे, त्याच काळात बंगाली मुस्लिमांना मदत करण्याचे निस्वार्थी कृत्य अशा नकारात्मक प्रचाराला जोरदार चापट म्हणता येऊ शकते. ऑर्किड फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष, सोहेल राणा आलम अडकलेल्या बंगाली मुस्लिम कामगारांना मिळालेल्या मदतीचे वर्णन करताना ते लिहितात, “मी भाजपा समर्थक नाही आणि संघाच्या बर्याच अजेंडाच्यादेखील विरोधात मी उभे आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बंगाली मुस्लिमांना केलेल्या मदतकार्याने मी भारावून गेलो आहे.”
लॉकडाऊनमुळे मुर्शिदाबादमधील ५ ते ६ बंगाली मुस्लिम कामगार धारावी आणि ७-८ बांकुरा व इतर जिल्ह्यातील काही कामगार मुंबईच्या घाटकोपर भागात अडकले होते. त्यांनी सोहेल राणा आलम यांच्याकडे मदतीची मागणी केली असता आलम यांनी घाटकोपरच्या एसपींसोबत संपर्क साधला. तेथून त्यांना नियंत्रण कक्षाचा नंबर मिळाला. येथूनच आलम यांना रा स्व संघाचे स्थानिक स्वयंसेवक महेश कुलकर्णी (नियंत्रण कक्षाकडून) यांच्याशी संपर्क साधावा असे कळाले की जे या भागातील मदतकार्याचे प्रमुख आहेत. जेव्हा नियंत्रण कक्षाने सोहेल यांना महेशचा संपर्क क्रमांक दिला, तेव्हा त्याला सांगण्यात आले की ही एक स्वयंसेवी संस्था आहे (आरएसएस नाही) जी गरजुंना मदतकार्य करते आहे. हे समजताच आलम यांनी त्वरित महेश यांच्याशी संपर्क साधला.
परंतु जेव्हा महेश कुलकर्णी यांनी आपण संघ स्वयंसेवक असल्याचे सांगितले, तेव्हा आलम यांच्या रा स्व संघाबाबतीतील पूर्वग्रहाने त्यांच्या मनात काही शंका निर्माण झाल्या. त्यांनी विचारले, ‘मी एक मुस्लिम आहे आणि गरजूसुद्धा मुस्लिम आहेत. मी संघाबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. तुम्ही मला मदत करणार याची मला खात्री नाही !’ हे ऐकताच महेश यांनी त्वरित उत्तर दिले, ‘आम्ही प्रथम मानव आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आम्हाला कोणत्याही भेदभावाशिवाय मानवतेची सेवा करण्यास शिकवते.’ हे ऐकतच सोहेल आलम निशब्द झाले. रा स्व संघाबाबत अशी बाजू त्यांनी यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती. पुढे महेश कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून धारावीत अडकलेल्या सर्व बंगाली मुस्लिम कामगारांना मदत मिळाली. तात्काळ मिळालेल्या मदतीमुळे त्यांना आश्चर्य वाटले नाही परंतु स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या या स्वयंसेवकांच्या करुणाभाव पाहून हे कामगार मंडळी अस्वस्थ झाले. कुलकर्णी यांनी धारावी येथे जाऊन देखील कामगारांना जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांना मदत केली.
वास्तविक पाहता घाटकोपर भागात अडकलेल्या बांकुरा कामगारांच्या मदतीसाठी सोहेल राणा आलम यांनी वारंवार अकबर पठाण, डीसीपी अंधेरी आणि धारावी पोलिस ठाण्यात असंख्य वेळा मदत मागितली. तथापि, प्रत्येक वेळी त्यांना तेथून नकार मिळाला. मागील अनुभवाच्या आधारे, सोहेलने यांनी पुन्हा महेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर धारावी नगर करवाह (सचिव) गणेश पांडी हे मदतीसाठी पुढे आले. महेश आणि गणेश या दोन्ही स्वयंसेवकांच्या अशा कार्यक्षम व समन्वित प्रयत्नांना पाहून सोहेल लिहितात, “या गंभीर परिस्थितीत आम्हाला गणेश पांडी यांची मदत मिळाली. त्यांचे आभार ! मी जे लिहित आहे हे माझ्यासाठी अविश्वसनीय आहे… मी … जो रा. स्व. संघ आणि भाजपाच्या विचारसरणीचा कट्टर विरोध करणारा आहे. परंतु या दोन लोकांच्या निस्वार्थी कार्याबद्दल मी त्यांचे भरभरून कौतुक करेल. असे न केल्यास मी कृतघ्न ठरेल.”
गणेश पांडी पाहतात की, एक भारतीय म्हणून प्रत्येकाला मदत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ते कोणत्याही समुदायाचे किंवा धर्माचे असो कोणत्याही स्वयंसेवी संस्थांना गरज भासल्यास त्यांनी मदतीसाठी विचारावे. आम्ही प्रत्येक गरजूंच्या मदतीसाठी प्रयत्नशील आहोत.’ सोहेल यांनी आणखी ३० जणांच्या रेशनची मदत मागितली आणि पांडी यांनी आवश्यक वस्तू पुरवल्या आहेत याची खात्री केली. अशा सक्रिय प्रतिसादाने भारावून गेलेले सोहेल लिहितात, ‘काही संकुचित विचारवंतांनी कितीही द्वेष पसरविला तरी समाज, धर्म किंवा राजकीय संबंधांचा विचार न करता जे लोक जन्मजात चांगले असतात ते नेहमीच चांगले असतात. कुलकर्णी आणि पांडी या दोघांनाही मनापासून शुभेच्छा.त्यांच्यातील मानवता श्रेष्ठ असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. मी ही कथा माझ्या फेसबुक वॉलवर पोस्ट केली आणि यावर ९०%पेक्षा जास्त टिप्पण्या या सकारात्मक होत्या. जे लोक स्वत: च्या फायद्यासाठी व समाजात फूट पाडण्यासाठी पत्रकारितेसारख्या माध्यमाचा सराव करतात आणि त्यांचे समर्थन करतात,ज्यांनी आरएसएसविरूद्ध मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण केला आहे,त्यांना स्वत: ची लाज वाटली पाहिजे.’अशा स्पष्ट शब्दांत सोहेलने समाजात द्वेष पसरिवणाऱ्यांना व त्याचे समर्थन करणाऱ्यांना खडे बोल सुनावले.