शहादा : श्री कृष्ण गोशाळेत चि.प्रा.हितेंद्र व चि.सौ.का. निकिता यांच्या विवाहनिमित्ताने त्यांच्या हस्ते वृक्षारोपण

Featured नंदुरबार
Share This:

श्री कृष्ण गोशाळेत चि.प्रा.हितेंद्र व चि.सौ.का. निकिता यांच्या विवाहनिमित्ताने त्यांच्या हस्ते वृक्षारोपण

शहादा (  वैभव करवंदकर ) : पाडळदा ता.शहादा येथील ज्येष्ठ पत्रकार व पत्रकार संघ खेतियाचे कार्याध्यक्ष डॉ सतीश नरोत्तम चौधरी यांचा मुलगा चि.प्रा.हितेंद्र व गोगापूर ता. शहादा येथील श्री रघुनाथ मोहन पाटील यांची मुलगी चि.सौ.का. निकिता यांनी आपल्या मुलाच्या व मुलीच्या लग्नासोहळ्यानिम्मित निसरपूर (खेतिया) येथील श्री कृष्ण गोशाळेत चि.प्रा.हितेंद्र व चि.सौ.का. निकिता यांच्या विवाहनिमित्ताने त्यांच्या हस्ते वृक्षारोपण कऱण्यात आले. यावेळी श्रीकृष्ण गोशाळेचे संत श्री 108 परमपूज्य संतोष चैतन्य महाराज, डॉ सतीश चौधरी सौ. योगिता चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी नवदांपत्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाच्या प्रारंभ हे त्यांनी वृक्षारोपण करून करण्यात आला. दोघे उभयंते उच्चशिक्षित असून त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी “झाडे लावा झाडे जगवा” हे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन पर्यावरण संतुलन राहावे यासाठी वृक्षारोपण केले आहे. सध्या पर्यावरणाचा ऱ्हास मोठया प्रमाणावर होत आहे हा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय आहे. म्हणुनच वृक्ष लागवड ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षारोपण करणे आजच्या काळाची गरज असून यासाठी प्रत्येक नवदांपत्यांनी वृक्षारोपण करावे असे आव्हान त्यांनी केले आहे. आजच्या या आधुनिक युगात पर्यावरणावर कुणाचेही लक्ष नाही वृक्ष लागवड केली तरच परिसर बहरलेला असेल त्यामुळे पर्यावरण स्वच्छ आणि सुंदर राहील म्हणून वृक्षारोपण करण्याची गरज आहे. एक एक झाड लावलं तर ते एक एक वृक्ष तयार होईल. पर्यावरण सरंक्षणासाठी एक चांगला संदेश नवदांपत्यांकडून देण्यात आला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
● फोटो – निसरपूर (खेतिया) येथील श्री कृष्ण गोशाळेत चि.प्रा. हितेंद्र व चि.सौ.का. निकिता यांच्या विवाहसोहळ्यानिम्मित त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करतांना सोबत श्रीकृष्ण गोशाळा चे संतश्री 108 परमपूज्य संतोष चैतन्य महाराज, डॉ सतीश चौधरी, सौ.योगिता चौधरी आदी

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *