
रस्ते विकास योजनांसाठी वर्ष 2022 पर्यंत सात कोटींची गुंतवणूक अपेक्षित – नितीन गडकरी
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): भारतमाला परियोजनेंतर्गत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय देशात रस्त्यांचा विकास करत आहे. भारतमाला परियोजनेच्या पहिल्या टप्प्याला आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समितीने 24 ऑक्टोबर 2017 मध्ये मान्यता दिली आहे.
या अंतर्गत आणि इतर राष्ट्रीय महामार्ग / रस्ते विकास योजनांसाठी वर्ष 2021-22 पर्यंत 6,92,324 कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक अपेक्षित आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.