
पंतप्रधान नरेंद्र मोदिंच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्यावतीने सेवा सप्ताहात विविध उपक्रम
नंदुरबार ( वैभव करवंदकर) नंदुरबार जिल्ह्यातील तलोदा तालुक्यातील मोड येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह सुरू असून यासेवा सप्ताहात नंदुरबार जिल्ह्यात विविध जनकल्याणकारी कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून यानिमित्ताने जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील पक्षाच्या पदाधिकार्यामध्ये उत्साह संचारला असून या सेवा सप्ताहात जिल्ह्यातील तळागाळातील भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कार्यक्रम घेण्यासाठी चढाओढ करताना दिसून येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील मोड येथे पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते 300 फेस मास्कचे वाटप नंदुरबार जिल्हा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण सिंह राजपूत यांनी आयोजित केलेल्या सेवा सप्ताहाच्या कार्यक्रमात करण्यात आले याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य राजेंद्र कुमार गावित,भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार जिल्हा सरचिटणीस निलेश माळी,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील तळोदा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अजय परदेशी,कैलास चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
तसेच तळोदा तालुक्यातील बोरद येथे तळोदा तालुकाध्यक्ष प्राध्यापक विलास डामरे व भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष चेतन गोसावी यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमातील उपस्थितांना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व तळोदा शहादा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी मार्गदर्शन केले यावेळी तळोदा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच नंदुरबार जिल्हा शिक्षक आघाडीच्या वतीने प्राध्यापक बी.डी.पाटील यांनी नंदुरबार तालुक्यातील पथराई येथे सेवा सप्ताह निमित्ताने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रदेश सदस्य राजेंद्र कुमार गावित नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस निलेश माळी भारतीय जनता पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील शिक्षक आघाडीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष बि.डी.पाटील मुकेश पाटील,कपिल चौधरी आदी शिक्षक उपस्थित होते. तसेच नंदुरबार येथे दिव्यांग सेल च्या वतीने दिव्यांगाना कृत्रिम अवयव वाटप यावेळी उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष असेल पाटील दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष राजेश चौधरी आदी उपस्थित होते.