सौ.योगिता पाटील यांची सं.गां.नि.योजना समिती सदस्यपदी निवड

Featured जळगाव
Share This:

सौ.योगिता पाटील यांची सं.गां.नि.योजना समिती सदस्यपदी निवड.

यावल (सुरेश पाटील) : तालुक्यातील विरावली येथील छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनच्या सचिव सौ.योगिता देवकांत पाटील यांची संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका सदस्यपदी निवड होताच परिसरातून व इतर सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
विरावली ग्रामपंचायतीच्या परिवर्तन पॅनलच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य सौ.शोभा युवराज पाटील,शकुंतला विजयसिंह पाटील,हमिदा टेनु तडवी व अ‍ॅड.देवकांत बाजीराव पाटील ग्रा.प.सदस्य तथा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष यावल यांनी व विरावली ग्रामपंचायत सदस्यांनी व गावातील जेष्ठ महिला कमलाबाई पाटील,प्रतिभा पाटील,कल्पना पाटील,कृष्णा पाटील आदीनी सौ.योगिता देवकांत पाटील यांचा सत्कार करत अभिनंदन केले .
सौ.योगिता देवकांत पाटील यांची संजय गांधी निराधार योजनत जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत साहेब यांनी नियुक्ती केल्या बद्दल मा.ना. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व यावल तालुक्यातून विरावली गावाला पहिल्यादाच एका उच्च शिक्षित महिला प्रतिनिधीलाच्या नावाला शिफारस केल्याबद्दल यावल -रावेर विधानसभेचे आमदार शिरीषदादा चौधरी व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी निवड केल्या बद्दल आभार मानत विरावली गावासह परिसरातील तालुक्यातील सर्व निराधार महिलाना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू असे सौ. योगिता देवकांत पाटील यांनी सांगितले.यावल तालुक्यातील सर्वसामान्य गोर-गरीब-गरजू निराधार लोकांच्या हितासाठी काम करण्याची जबाबदारी दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,माजी मंत्री एकनाथराव खडसे,जळगांव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भैय्यासाहेब पाटील,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा मुक्ताईनगर विधान सभेचे आमदार चंद्रकांत पाटील,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जि.प.सदस्य प्रभाकरआप्पा सोनवणे,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुकेश येवले, विधानसभेचे क्षेत्र प्रमुख अनिल साठे,शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र सोनवणे,यांचे आभार मानले आहे.सौ.योगिता पाटील यांचे नियुक्ती बद्दल विरावली गावासह तालुक्यातून सामाजिक व राजकीय क्षेत्रातुन सौ.योगिता पाटील यांना मान्यवरांनी अभिनंदनासह पुढील भावी वाटचालीस हार्दीक शुभेच्या दिल्या आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *